भारताच्या ‘या’ महान खेळाडूच्या बॅटने आफ्रिदीचे ‘सुपरफास्ट’ शतक

आफ्रिदीचा 'गेम चेंजर' आत्मचरित्रातून खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी अष्टपैलू आणि धडाकेबाज खेळाडू शाहिद आफ्रिदी हा त्याने केलेल्या सुपरफासट शतकामुळे ओळखला जातो. तसेच त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याने पाकिस्तानच्या हातून निसटलेले सामाने जिंकून दिले आहेत. शाहिद आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरितत्रामध्ये त्याच्या सुपरफास्ट शतकाबाबत खुलासा केला आहे.

शाहिद आफ्रिदीने आपल्या पदार्पणात ज्या बॅटने ३७ चेंडूत शकत करण्याची विक्रमी खेळी केली होती ती बॅट भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची होती. असा मोठा खुलासा त्याने आपल्या आत्मचरित्रात केला आहे. शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात सर्वात वेगवान शतक करण्याचा विश्वविक्रम केला होता.

विश्वविक्रमी शतक करणाऱ्या बॅट विषयी त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे. तो म्हणतो ज्या बॅटने मी विश्वविक्रमी शतक ठोकले ती बॅट सचिन तेंडुलकरची होती. सचिन तेंडुलकरने प्रतिकृती तयार करण्यासाठी त्याची बॅट वकार युनिसकडे दिली होती. वकार ने ती बॅट सिआलकोट येथील क्रीडा साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला देणार होता. परंतु ती बॅट त्या कंपनीकडे न जाता माझ्याकडे आली. आणि त्याच बॅटने मी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ती बॅट सिआलकोट येथे नेण्याआगोदर वकारने ती मला दिली असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे. त्यामुळेच मी झळकावलेले पहिले शतक हे तेंडुलकरच्या बॅटीतून आले.

आपल्या आत्मचरित्रात त्याने अनेक खुलासे केले आहे. आपल्या जन्माच्या तारखेबाबतचा खुलसा करताना त्याने म्हटले आहे, माझा जन्म १९८० सालचा नाहीत तर १९७५ सालचा आहे. ज्यावेळी मी ३७ चेंडूत शतक झळकावले त्यावळी मी १६ नाही तर १९ वर्षाचा होतो. संबंधीत अधिकाऱ्यांनी आपले वय चुकीचे लावले असल्याचा दावा त्याने आपल्या आत्मचरित्रात केला आहे. आफ्रिदीने केलेला दावा चुकीचा आहे. कारण तो १९७५ साली जन्मला असेल तर १९९६ मध्ये त्याचे वय १९ नाहीत तर २१ असायला हवे. मात्र तो १९ वय असल्याचे सांगत आहे.