Shahid Afridi | शाहिद आफ्रिदीने दिला बाबर आझमला सल्ला, “या फलंदाजाला रिझवानसोबत ओपनिंग पाठवावे”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shahid Afridi | पाकिस्तानच्या (Pakistan) टीमने सेमी फायनल गाठल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी टीमला सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या टीमने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांना महत्वाच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या टीमने चांगली खेळी केल्याने अनेक दिग्गज खेळाडूंनी टीमला सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) देखील टीमला एक सल्ला दिला आहे.

काय म्हणाला शाहीद आफ्रिदी?
शाहिद आफ्रीदीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला दिला आहे. मोहम्मद हॅरिसला (Mohammed Harris) रिझवानसोबत (Rizwan) ओपनिंगला फलंदाजी करण्यासाठी पाठवा. एक विकेट पडल्यानंतर तुम्ही फलंदाजीसाठी जा, टीम संतुलित ठेवणं सध्या अधिक गरजेचं आहे असा सल्ला शाहीद आफ्रिदीने कर्णधार बाबर आझमला दिला आहे. शाहिद आफ्रिदीचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

न्यूझीलंडविरुद्ध होणार सेमी फायनल
यंदाच्या T -20 च्या वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडबरोबर (New Zealand) होणार आहे.

 

कुठे आणि कधी होणार सामना?
बुधवार, 9 नोव्हेंबर , न्यूझीलंड वि. पाकिस्तान, पहिली सेमी फायनल, सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दु. 1.30 वा.

 

Advt.

Web Title :- Shahid Afridi | shahid afridi babar azam pakistan team t20 world cup 2022 semifinale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Satara News | पुण्यात येताना आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा ठिय्या आंदोलन

Retired ACP Subhaschandra Dange Passes Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन