Coronavirus : भारताबाबत नेहमी गरळ ओकणार्‍या शाहिद आफ्रिदीला ‘कोरोना’ची लागण, ट्विटरवर लिहीलं – ‘दुआओं की जरूरत है’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यानं लिहलं आहे की, गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.

कोरोनामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्यानं मदत करत आहे. त्यानं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये गरजूना अन्नधान्य वाटप केले. या कालावधीत तो अनेक लोकांना भेटला आणि त्यामुळेच त्याला कोरोना झाल्याची चर्चा सुरु आहे. आफ्रिदीनं बागलादेशचा खेळाडू मुश्फिकर रहीम यालाही मदत केली. रहीमनं बांगलादेश मधील लोकांच्या मदतीसाठी त्याची द्विशतकाची बॅट लिलावासाठी ठेवली होती आणि आफ्रिदीनं ती खरेदी केली.

यापूर्वी, पाकिस्तानचा माजी सलामीवर तौफीक उमर यालाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानं कोरोनावर मात केली आहे. उमरनं 2001 मध्ये बांगलादेशाविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होता. त्यानंतर तो 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला होता आणि त्यानंतर आलेला त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उमरनं लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

38 वर्षीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच योग्य ती काळजी घेतली. त्यानंतर त्याने सांगितले की, दोन आठवड्याच्या आयोसोलेशन नंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अल्लाहमुळं मी तंदरुस्त झालो आहे. या संकटकाळात प्रत्येकानं स्वत:ची काळजी घ्यायला हवी. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय आणि योग्य पावलं उचलायला हवीत.