Shahid Afridi | होय, मी चीटिंग केली होती ! ‘त्या’ सामन्याबाबत शाहिद आफ्रिदीचा मोठा खुलासा 

कराची : वृत्तसंस्था – Shahid Afridi | पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चिटिंग यांचा फार जवळचा संबंध आहे. पाकिस्तानचे (Pakistan) क्रिकेटपटू मॅच फिंक्सिंग, स्पॉट फिक्सिंग यामुळे अनेकदा वादात सापडले आहेत. यामुळे अनेकवेळा त्यांच्यावर टीकासुद्धा करण्यात आली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) याचे नाव या सगळ्यांमध्ये सगळ्यात वरती आहे. त्याने  2005 मध्ये केलेल्या एका गैरकृत्याची कबुली दिली आहे. त्यावेळी त्याने एका सामन्यादरम्यान खेळपट्टीशी छेडछाड केली होती. आणि असे करणे ही माझी मोठी चूक होती अशी त्याने कबुली दिली आहे.

काय म्हणाला शाहीद आफ्रिदी?

‘सन 2005 मध्ये पाकिस्तान (Pakisthan) आणि इंग्लंड (England) यांच्यात फैसलाबादमध्ये येथे एक कसोटी झाली होती. या सामन्यात माझे सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करत होतो. मात्र, खेळपट्टीकडून काही केल्या मदत मिळत नव्हती. तेवढ्यात बाजूला एक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सर्वांचे लक्ष त्याकडे गेले. दरम्यान, मी शोएब मलिकशी (Shoaib Malik) बोलताना म्हटले की मला खेळपट्टीवर एक रफ पॅच (खड्डा) तयार करावे असे वाटते आहे. यामुळे चेंडू स्पिन व्हायला मदत होईल. मलिक देखील म्हणाला, हो पॅच तयार कर कोणी तुझ्याकडे बघत नाही.’ यानंतर मी खेळपट्टीवर एक रफ पॅच बनवला मग खेळपट्टीकडून मला मदत मिळण्यास सुरुवात झाली. आता मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. ही माझी चूक होती अशी कबुली शाहीद आफ्रिदीने दिली आहे. (Shahid Afridi)

फैसलाबाद कसोटी (Faisalabad Test) ही तीन सामन्यांच्या मालिकेतील तो दुसरा कसोटी सामना होता.
पाकिस्तानने याअगोदरचा पहिला कसोटी सामना 22 धावांनी जिंकला होता,
तर दुसरा फैसलाबाद कसोटी सामना ड्रॉ झाला होता. यानंतर पाकिस्तानने तिसर्‍या कसोटीमध्ये एक डाव
आणि 100 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 ने जिंकली होती.
शाहीद आफ्रिदी आपल्या कारकिर्दीत 27 कसोटी, 398 वन-डे आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

Web Title :- Shahid Afridi Yes, I cheated! Shahid Afridi’s big revelation about ‘that’ match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात गोळीबार, 8 वर्षाची मुलगी गोळी लागून जखमी; नर्‍हेमधील घटना, बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात

Rohit Sharma World Record | हिटमॅन रोहितने नागपूर T-20 मध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड