शाहीद आफ्रिदीची मुलगी रूग्णालयामध्ये, PAK च्या माजी खेळाडूची लंका प्रीमिअर लीगमधून माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला आहे. या स्पर्धेत तो गॅल ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार आहे. एलपीएलमध्ये आतापर्यंत तो केवळ तीन सामने खेळला आहे. आफ्रिदीने बुधवारी ट्विट करत आपण मायदेशी परतल्याचे सांगितले.

पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूने ट्विटमध्ये म्हटलं की, “दुर्दैवाने काही वैयक्तिक कारणास्तव मला घरी जावे लागले आहे. परिस्थिती ठीक झाल्यानंतर मी पुन्हा एलपीएलमध्ये येईन. संघाला शुभेच्छा.”

तथापि, LPL च्या अधिकृत ट्विटर हॅन्डलने सांगितल्यानुसार, आफ्रिदीच्या मुलीची प्रकृती अचानक खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

https://twitter.com/LPLt20official/status/1334187847557861376?s=20

दरम्यान, एलपीएल स्पर्धेत आफ्रिदीने पुनरागमन केल्यास श्रीलंकेत त्याला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. पण असे सांगितले जातेय की, त्याला ३ दिवसांपेक्षा अधिक काळ विलगीकरणात ठेवले जाणार नाही. कारण त्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. श्रीलंकेत दाखल होण्याच्या पूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आलेली. त्यावेळी त्याच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या.