शाहिद आणि मीराचे बीचवरील फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता शाहिद कपूर त्याचा आगामी सिनेमा कबीर सिंगमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या कबीर सिंगचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर य सिनेमातील एक गाणंही रिलीज करण्यात आलं होतं. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. या सिनेमाच ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला होता. सध्या शाहिद कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला. त्याचे फॅमिली सोबतचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

शाहिद कपूर नेहमीच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला बॅलन्स करत असतो. तो नेहमीच आपल्या कुटुंबाला म्हणजे पत्नी आणि मुलांना वेळ देत असतो. माहिती मिळाली आहे की, शाहिद आपल्या फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी थायलंडमध्ये गेला आहे. सध्या त्याचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो सध्या सोशल व्हायरल होताना दिसत आहेत.

शाहिदचा एक फोटो चाहत्यांना जास्तच आवडला आहे. पत्नी मीरा राजपूत सोबत बीचवरील एक सेल्फी आहे. दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसत आहे. दोघेही खूप क्युट दिसत आहे. शाहिदने या फोटोत गॉगल घातला आहे. मीराही एकदम हॉट अंदाजात दिसत आहे. शाहिददेखील अॅटीट्युडमध्ये दिसत आहे. दोघांची ही स्टाईल चाहत्यांना आवडत आहे. या फोटोला शाहिदने खास कॅप्शन दिले आहे. आम्ही(#us) असं शाहिदने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

शाहिद कपूरचा आगामी सिनेमा कबीर सिंग मध्ये कियारा अडवाणी देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. प्रेक्षकांचा याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे संदीप रेड्डी वांगा यांनीच कबीर सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 21 जून 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.