कबीर सिंह शाहिदचा 20 वर्षापुर्वीचा जाहिरातीचा व्हिडीओ आता ‘सोशल’वर, तुम्हाला आठवतं का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्टर शाहिद कपूरचा कबीर सिंह हा सिनेमा खूपच गाजला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित झाला होता. काही ठिकाणी अजूनही या सिनेमाची स्क्रिनिंग सुरु आहे. शाहिद आज सक्सेसफुल अॅक्टर आहे. शाहिदच्या करिअरच्या सुरुवातीच्या फेजमध्ये खूपच वेगळा दिसत होता. शाहिदचा एक जुना जाहिरातीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

फॅब्रिक व्हाईटनरच्या या जाहिरातीत शाहिद खूपच सडपातळ दिसत आहे. यात शाहिदचे केसही खूप मोठे आहेत. एका दूरदर्शन फॅन पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहिद एक यात खूपच क्युट दिसत आहे. 2003 साली आलेल्या इश्क विश्क या सिनेमातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. केन घोषने हा सिनेमा डायरेक्ट केला होता. यातील शाहिदच्या अभियाचे खूपच कौतुक झाले होते.

शाहिदने अनेक सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. 1999 साली आलेल्या ताल या सिनेमातही त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. त्याला सिनेसृष्टीत तब्बल 16 वर्षे झाली आहेत.

शाहिदच्या कबीर सिंहने 275 कोटींहून अधिक कमाई केली आहे. एका मुलाखतीत बोलताना शाहिद म्हणाला की, “मी खूप इमोशनल झालो होतो. मी खूप आभारी आहे. मला वाटतं मी याचा हकदार नाही. याने जरा जास्तच कमाई केली आहे.”

आरोग्यविषयक वृत्त