‘या’ 8 अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय शाहिद कपूरचं नाव, ‘या’ फेमस टेनिसपटूचाही समावेश ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहिद कपूर इंडस्ट्रीतील चॉकलेट हिरो म्हणून फेमस आहे. आज आपण शाहिदसोबत अफेअरच्या चर्चा असणाऱ्या 8 अभिनेत्रींची नावं जाणून घेणार आहोत.

1)  ऋषिता भट – आंखो मे तेरा ही चेहरा या म्युझिक व्हिडीओत दोघांनी एकत्र काम केलं आहे. ऋषिताला जास्त यश मिळालं नसलं तरीही तिच्या सौंदर्याची कायमच चर्चा होत आली आहे. तेव्हा शाहिद आणि ऋषिता खूप क्लोज होते असंही बोललं जात आहे.

2)  अमृता राव – एक काळ असाही होता जेव्हा विवाह सिनेमात काम करताना अमृता रावच्या प्रेमात कधी पडला हे शाहिदलाही कळलं नाही.

3)  करीना कपूर – शाहिद आणि करीनाही प्रेमात आकंठ बुडाले होते. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं आहे. जब वी मेट हा सिनेमा त्यांच्यासाठी महत्त्वाचा धागा ठरला. परंतु नंतर त्यांच्या नात्यात कटुता आली.

4)  प्रियंका चोपडा – कमिने सिनेमात काम केल्यानंतर प्रियंका चोपडा आणि शाहिद कपूर यांनी बराच वेळ एकमेकांना डेट केलं आहे. परंतु काही काळानं दोघं वेगळे झाले.

5)  विद्या बालन – 2008 साली आलेल्या किस्मत कनेक्शन या सिनेमात काम केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगू लागल्या होत्या.

6)  सोनाक्षी सिन्हा – सोनाक्षी सिन्हा देखील शाहिदच्या प्रेमात असल्याचं बोललं जात होतं. अशीही माहिती आहे की, सोनाक्षीच्या वाढदिवशी शाहिद तिला लाँग ड्राईव्हला घेऊन गेला होता.

7)  जॅकलीन फर्नांडिस – शाहिद आणि जॅकलीन एका रात्री डिनरला सोबत दिसल्यानंतर जॅकलीन आणि शाहिदच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. जॅकना चेहरा लपवण्याचा प्रयत्नही केला होता. दोघांच्या नात्याबद्दल खूप काही बोललं गेलं होतं.

8)  सानिया मिर्झा – अनेकांना हे नाव वाचून धक्का बसला असेल. परंतु हे खरं आहे टेनिसपटू सानिया मिर्झा हिचंही नाव शाहिदसोबत जोडलं गेलं आहे. 2008 साली ही लव स्टोरी सुरू झाली आणि तेव्हाच संपली. दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.