शाहिद कपूरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता शाहिद कपूर त्याच्या फॅमिलीला पूर्ण वेळ देत असतो. शाहिद कपूरने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला चांगलेच बँलन्स केले आहे. तो अनेकदा त्याची मुले मीशा आणि जैन सोबत वेळ घालवत असतो.

नकुताच शाहिदने त्याचा मुलगा जैनसोबतचा आपला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहिद मुलगा जैन सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. या व्हिडीओत शाहिदने अनेक फिल्टरचा वापर केल्याचे दिसत आहे. जैन खूपच क्युट दिसत आहे.

शाहिदने त्याचा आणि जैनचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शाहिदने काहीही कॅप्शन दिलेले दिसत नाही परंतु #shadyboys असा हॅशटॅगही दिला आहे. जैन हा शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांचा छोटा मुलगा आहे. जैनला मीशा नावाची एक मोठी बहिण आहे. जैनचा जन्म गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाला आहे. काही दिवसांपूर्वी जैनचा एक फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. मीराने तिच्या इन्स्टाग्रामवरून आपल्या तान्हुल्याचा फोटो शेअर केला होता.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, शाहिद कपूर त्याचा आगामी सिनेमा कबीर सिंग मध्ये दिसणार आहे. यात कियारा अडवाणी देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. प्रेक्षकांचा याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे संदीप रेड्डी वांगा यांनीच कबीर सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 21 जून 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.