शाहिद, प्रियांकाच्या नात्याबद्दल शाहिदचा भाऊ इशानने दिली ‘ही’ कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर याचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आले. शाहिदच्य एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री करिना कपूर, विद्या बालन, प्रियांका चोप्रा यांच्यासोबतचे प्रकरण चांगलेच गाजले होते. इशानने नुकतेच नेहा धुपिया सोबत ‘ BFF with Vogue’ कार्यक्रमात हजेरी लावली. त्या कार्यक्रमात शाहिद कपूरचा भाऊ इशानला नेहाने विचारले की, शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंडपैकी सगळ्यात जास्त कोण आवडते. त्याने असे उत्तर दिले……..

‘ BFF with Vogue’ कार्यक्रमात इशानला आणि अभिनेत्री नेहा धुपिया या दोघांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नेहाने इशानला विचारले की, शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंडपैकी तुला सगळ्यात जास्त कोण आवडते ? , असे विचारण्यात आले, तेव्हा तो या प्रश्नामुळे इशान टेन्शनमध्ये आला. त्याने घाबरत उत्तर दिले की, हे देवा …..मला सगळ्यात जास्त कोण आवडते हे मी सागू शकणार नाही. पण माझ्या फ्रेंड लिस्ट प्रियांका चोप्राचे नाव सगळ्यात पहिल्यांदा येईल.

अभिनेता शाहिद कपूर याच्या नावापुढे अनेक अभिनेत्रींची नावे जोडली गेले. यामध्ये प्रियांका चोप्रा, विद्या बालन, करिना कपूर यांची नावे होती. करिना आणि शाहिद तर हॉट कपल होते. कालांतराने यांचे ब्रेकअप झाले. नंतर शाहिद आणि प्रियांका या दोघांची चर्चा ही खुप व्हायरल झाली होती. पण, या दोघांच्या नात्याबद्दल त्यांनी कधीच कबूल केले नाही.

शाहिद कपूरचा भाऊ इशानने सांगितले की, अभिनेत्री नेहा धुपियाने आजवर आनेक चित्रपटात काम केले आहे. ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ‘चॅट शो’ साठी जास्त चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमात आजवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नेहासोबत अनेक सेलिब्रेटिंनी आपले सिक्रेट शेअर केले. ‘BFF with Vogue’ कार्यक्रमाच्या या तिसऱ्या सिझनमध्ये इशान खट्टरसोबत राजकुमार राव, सोनाली बेंद्रे, व सोनालीच्या मैत्रिणी सुझान खान, गायत्री ऑबेरॉय, जान्हवी आणि खुशी कपूर, करिना कैफ यांसारखे सेलिब्रेटी या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे.