… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी ही जोडी लवकरच कबीर सिंह या सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सध्या दोघांकडून सुरू आहे. अशातच दोघांनी एका शोमध्ये हजेरी लावली यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्याचे दिसून आले.

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी या शोमध्ये कॉमेडियन कपिल सोबत भरभरून गप्पा मारल्या. खूप धमाल केली. यावेळी कपिलने शाहिद एक प्रश्न विचारला की, शाहिद प्रत्येक सिनेमात आपली हेअरस्टाईल का बदलतो ? शाहिद कपिलच्या या प्रश्नाचे खास अंदाजात उत्तर दिले.

कपिलच्या प्रश्नाला उत्तर देत शाहिद म्हणाला की, “एकदा माझे वडिल (पंकज कपूर) यांनी मला एक सल्ला दिला होता की, प्रत्येक सिनेमात आपल्या लुकसोबत एक्सपेरिमेंट करत रहायला पाहिजे. त्यामुळे मीसुद्धा माझ्या हेअरस्टाईल सोबत एक्सपेरिमेंट करत असतो. द कपिल शर्मा शो मध्ये कपिलने शाहिद आणि कियाराला अनेक प्रश्न विचारले.

https://youtu.be/ffn6XHwgE3I

काही दिवसांपूर्वीच कबीर सिंह सिनेमाच्या प्रमोशनमध्ये शाहिद कपूरने कियारा आडवाणीच्या रिलेशनशिप स्टेटसला घेऊन खुलासा केला होता. ती अजूनही सिंगल आहे असं त्याने सांगितलं होतं. हे उत्तर शाहिदने मीडियाच्या त्या प्रश्नावर दिले होते. जेव्हा त्याला विचारलं होतं की, त्यांने कॉलेजमध्ये कधी रोमँस केला होता का किंवा नाही.

दरम्यान कबीर सिंह हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. संदीप वानगा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात शाहिद सर्जनच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा अर्जुन रेड्डी या सिनेमाचं हिंदी वर्जन आहे.

 

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

You might also like