कियारा आडवाणीच्या रिलेशनशिप बद्दल शाहिद कपूरचा ‘मोठा’ खुलासा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्टर शाहिद कपूर या दिवसांमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ च्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत बॉलीवूडची अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत असणार आहे. शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी या दिवसांमध्ये ‘कबीर सिंह’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहिद आणि कियाराने आपल्या खाजगी आयुष्याविषयी काही गोष्टी सांगितल्या.

शाहिद कपूरने किनारा आडवाणीच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल सांगितले की ती आत्तापर्यंत सिंगल आहे. शाहिद कपूरने पुढे सांगितले की, मी तर लग्न केले आहे त्यामुळे तर मी आता रिटायर्ड होण्यापर्यंत पोहोचलो आहे परंतु कियारा आतापर्यंत मार्केट मध्ये आहे कारण ती अजूनही सिंगल आहे. शाहिद कपूरच्या वक्तव्याला सहमती दाखवत कियारा अडवाणीने सांगितले की जेव्हा ती मोठी होत होती तेव्हा तिचे स्वप्न होते की तिला तिच्या आयुष्यात एक चांगला व्यक्ती भेटावा, पण असे काहीच झाले नाही.

नुकतेच ‘कबीर सिंह’ च्या प्रमोशनमध्ये शाहिद कापूरने आपल्या ब्रेकअप विषयच्या वाईट गोष्टी सुद्धा सांगितल्या. त्याने सांगितले की मी या गोष्टींमधून सुद्धा निघालो आहे जेव्हा ब्रेकअप नंतर माणूस स्वतःला त्रास करून घेतो. या परिस्थितीतून बाहेर कशे येऊ शकतो ही गोष्ट देखील त्याने सांगितली. त्याने सांगितले की, या नकारात्मक भावनांवर मात करण्याचा एक मार्ग म्हणजे तो आपल्या कामात पूर्णपणे रमुन जायचा, जेणेकरुन तो स्वत: ला हाताळू शकेल. ‘कबीर सिंह’ चित्रपट २१ जुनला थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे.