…म्हणून मी करिनाला कधीही विसरू शकणार नाही : शाहिद कपूर

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरने आपल्या एक्स गर्लफ्रेंडविषयी कधीच सिक्रेट ठेवले नाही. करिना आणि शाहिद यांचे ब्रेकअप झाले त्यानंतर प्रियांका चोप्रा शाहिदच्या आयुष्यात आली. त्यांचे रिलेशन फार काळ टिकले नाही. प्रियांकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला शाहिद कपूर आणि पत्नी मीराने हजेरी लावली होती आणि त्यांनी प्रियंकाला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या पण शाहिद करिनाच्या लग्नाला का पोहचला नाही ? याचे उत्तर शाहिदने दिले आहे.

https://www.instagram.com/p/ByhDm6anApq/?utm_source=ig_embed

ब्रेकअपनंतर करिना आणि शाहिदने २०१६ ‘उडता पंजाब’ चित्रपटात काम केले होते पण ते दोघे स्क्रिनवर सोबत दिसले नाही. एका मुलाखतीत शाहिदला विचारले गेले की, तु प्रियंका आणि निकच्या रिसेप्शनला गेला होता. मग सैफ आणि करिनाच्या रिसेप्शनला का गेला नाही. कदाचित त्याला रिसेप्शनचे आमंत्रण दिले नसेल. यावर शाहिद म्हणाला की, मला माहित नाही. याला खूप वर्ष होऊन गेली आहे. मला वाटत नाही रिसेप्शनचे आमंत्रण मिळाले असेल.

एवढेच नव्हे तर करण जोहरच्या कार्यक्रमात देखील शाहिदला विचारले गेले की,  प्रियंका किंवा करिनाची कोणती पण आठवण तु मिटवू शकतो. शाहिदने सांगितले की, माझे आणि करिनाचे रिलेशन खूप काळ टिकले. मी प्रियंकासोबत काही काळ होतो. मला वाटते की, मी आज जे आहे ते माझ्या अनुभवामुळे आहे. यामुळे मी कोणतीच आठवण मिटवू शकत नाही. कारण मी यामधून खूप काही शिकलो.

शाहिदने प्रियंका आणि निकला शुभेच्छा देऊन म्हणाला की, लग्न ही खूप सुंदर भावना आहे. मी माझ्या अनुभवावरून बोलत आहे. प्रियंका खूप चांगले काम करत आहे. तिच्यासाठी मी खूप खुश आहे.  प्रियंकामध्ये एक स्टार बनण्याची क्लालिटी होती आणि ते तिने सिद्ध करुन दाखविले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

 

 

You might also like