अभिनेत्री कंगनासोबतच्या ‘किसिंग’ सीनला शाहिद कपूर म्हणाला ‘चिखल’, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१७ साली आलेल्या रंगून या सिनेमात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. या सिनेमातील शाहिद आणि कंगनाच्या किसिंग सीनची मात्र खूप चर्चा झाली होती. या सीनमध्ये दोघेही चिखलाने भरलेले होते.

नुकतंच नेहा धुपियासोबत बोलताना शाहिदला रंगून सिनेमातील सर्वात खराब सीनबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शाहिद म्हणाला की, “हा एक विचार न करता अचानक विचारण्यात आलेला प्रश्न आहे. एकदम सर्व आठवणी ताज्या झाल्या. जास्त काही आठवत नाही. मी तर ब्लँक झालो आहे. जर सीन चिखलात होता तर तो चिखल होता.”

शाहिद आणि कंगनाच्या नात्यात फार काही गोडवा नाही. या आधीही एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, “रंगूनच्या सेटवर शाहिद सोबत एकच कॉटेज (झोपडी) शेअर करणं हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. या शिवाय त्याच्या सोबत किसींग सीन करणं म्हणजे खूपच घृणास्पद होतं.”

रंगूनच्या सेटवर शाहिद आणि कंगना जितके सहज ऑनस्क्रीन दिसतात. तेवढेच सहज ते ऑफस्क्रीन नव्हते. दोघांमध्ये काही दिवस वर्ड वॉर झाले आहे. शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल झाले तर त्याचा आगामी सिनेमा कबीर सिंह २१ रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमा त्याने एक दारू पिणाऱ्या आणि नशेबाज सर्जनची भूमिका साकारली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

 

Loading...
You might also like