विद्यार्थ्याला ‘कौन बनेगा करोडपती’मधून आला ‘बोगस’ कॉल, 40 हजार खात्यातून ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला कुणी कोण बनेगा करोडपातीमधून फोन करून इनाम देण्याचे म्हणत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सायबर क्राईमचे शिकार होऊ शकता. अशाचप्रकारे उत्तरप्रदेशातील शाहजहांपुर येथील नागरिकांना सायबर क्राईमचे शिकार बनवले जात आहे. कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नावाखाली नागरिकांना हा गंडा घालण्यात येत असून अनेक नागरिकांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. तेथील एका विद्यार्थ्याला ‘कोन बनेगा करोडपाती’मधून फोन असल्याचे सांगून तुम्ही या कार्यक्रमात 25 लाख रुपये जिंकल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला फोनवर काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर हि राशी जिंकल्याचे त्याला सांगण्यात आले.

पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, इनकम टॅक्स आणि इतर कामांसाठी त्याने सुरुवातीला फोन करणाऱ्याच्या खात्यात 40 हजार रुपये जमा केले. त्यानंतर देखील त्याने आणखी पैशाची मागणी केली असल्याची पीडित विद्यार्थ्याने पोलिसांना दिली आहे. अरविंद मौर्या असे या विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सावध राहण्याचे आवाहन
पोलिसांनी या प्रकरणात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही प्रकारे असा फोन आल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सावध राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी