‘लॉ’च्या विद्यार्थीनीचं ‘लैंगिक’ शोषण केल्याप्रकरणी चिन्मयानंदला SIT कडून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलेले स्वामी चिन्मयानंद यांना एका मुलीशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल आणि केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल अटक करण्यात आली आहे. विशेष पोलीस पथकाने स्वामींना अटक केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या आश्रमाजवळ ठेवण्यात आला होता.

विशेष पोलीस पथक त्यांना त्यानंतर घेऊन पोलीस ठाण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या आश्रमाजवळ ठेवला होता. त्यानंतर पोलीस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन गेले. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली.

KGMU लखनऊमध्ये नाही गेले स्वामी चिन्मयानंद –
प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये भरती असलेले स्वामी चिन्मयानंद यांना लखनऊच्या KGMU मध्ये हलवण्याचा विचार होता. मात्र त्यांनी तेथे उपचारासाठी जाण्यास नकार दिला. स्वामींनी डायरिया झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याबरोबरच्या व्यक्तींनी त्यांना आयुर्वेदिक उपचार केले.

एसआयटीला मिळणार मेडिकल रिपोर्ट –
विशेष तपास पथक स्वामींच्या उपचारावर लक्ष ठेऊन आहे. मेडिकल कॉलेजच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. पूजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला चिन्मयानंद यांची प्रकृती नाजूक होती. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून याचा मेडिकल रिपोर्ट एसआयटीला पाठवण्यात येईल.

चिन्मयानंद यांच्या शाळेत शिक्षिका आहे विद्यार्थिनीची आई –
आरोप केलेल्या विद्यार्थिनीची आई हि चिन्मयानंद यांच्या शाळेत सह शिक्षिका आहे. यावर्षीच मे महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिन्मयानंद यांचे एक कॉलेज देखील आहे. या मुलीची आई हे पहिली ते आठवीच्या मुलांना शिकवण्याचे काम करत असे. त्याचबरोबर विशेष तपास पथकाने यासंदर्भात देखील कॉलेज प्रशासनाकडे माहिती मागितली असून या ठिकाणी किती कर्मचारी काम करत आहेत तसेच त्यांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे. याची देखील माहिती घेण्यात येत आहे.

चिन्मयानंद यांच्या सांगण्यावरून मिळाली नोकरी –
मुलीच्या आईचा घरगुती वाद झाल्यानंतर ती आपल्या मुलीला होस्टेलवर सोडून गेली होती. त्यानंतर तेथे या महिलेला मे महिन्यात नोकरी मिळाली. त्यानंतर 24 ऑगस्टपासून महिला या ठिकाणी कामाला आलेली नाही.

Visit – policenama.com 

You might also like