सांगोल्यामधून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विजयी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या अनिकेत देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय साजरा केला. या निवडणुकीत दोघांमध्येही काट्याची टक्कर झाली असून अखेर यामध्ये शहाजीबापू पाटील यांनी बाजी मारली. यामध्ये शहाजीबापू पाटील यांना 98763 मते मिळाली असून अनिकेत देशमुख यांना 97688 मते मिळाली असून त्यांनी देशमुख यांचा केवळ 715 मतांनी पराभव केला आहे.

या मतदारसंघात दोघांमध्ये काट्याची टक्कर झाली असून शेवटपर्यंत कोण विजयी होणार याची माहिती मिळत नव्हती. मात्र अखेर पाटील यांनी या लढतीत विजय मिळवला. या मतदारसंघातून याआधी अनिकेत देशमुख यांचे आजोबा गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे ११ वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे यावेळी अनिकेत यांच्यासाठी हा विजय सोपा असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
1) शहाजीबापू पाटील (शिवसेना )-98763 मते
2) अनिकेत देशमुख (शेतकरी कामगिरी पक्ष )-97688 मते
3) विष्णू येलमार (वंचित बहुजन आघाडी )-1031 मते
4)राजश्री नागाने पाटील (अपक्ष )-4468 मते
5बापूसाहेब ठोकळे (अपक्ष)-1584 मते
6)राजाराम काळेबाग (अपक्ष )-1927 मते
7) नोटा -694

टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com