shahnawaz hussain : वरिष्ठ भाजपा नेते शाहनवाज हुसैन झाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : भाजपा नेते शाहनवाज हुसैन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शाहनवाज हुसैन यांनी ट्विट करत स्वता ही माहिती दिली आहे. बिहार निवडणुकीत भाजपाचे स्टार प्रचारक असलेले शाहनवाज हुसैन कोरोना संक्रमित असल्याचे आढळल्यानंतर त्यांनी ट्विट केले आहे की, मी काही अशा लोकांच्या संपर्कात आलो होतो, जे कोरोना संक्रमित होते. आज मी माझी टेस्ट केली, जी पॉझिटिव्ह आली. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती आहे की, त्यांनी सरकारी गाईडलाइन्सनुसार आपली कोविड टेस्ट करावी.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहनवाज हुसैन दिल्ली एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या बरे वाटत आहे आणि घाबरण्याची आवश्यकता नाही. बिहारच्या अररियाच्या फारबिसगंजमध्ये निवडणूक सभेला संबोधित करताना शाहनवाज हुसैन यांनी म्हटले होते की, मुस्लिमांसाठी भारतापेक्षा चांगला देश नाही, हिंदूपेक्षा चांगला कोणता मित्र नाही आणि नरेंद्र मोदींपेक्षा चांगला कुणी पीएम नाही.

मागील काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा मृत्यू झाला होता. त्यांची कोरोना टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली होती. उप राष्ट्रपती वेंकैया नायडू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया सुद्धा कोरोना संक्रमित आढळले होते. मात्र, या नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतेच काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद कोरोना संक्रमित आढळले होते.

55,871 नवीन केस
देशात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे कमी होत असल्याचे दिसत आहे. लागोपाठ पाचव्या दिवशी बुधवारी 60 हजारपेक्षा कमी नवी प्रकरणे समोर आली. सोमवारी 50 हजारपेक्षा सुद्धा कमी नवीन केस सापडल्या. नवीन प्रकरणे कमी होत आहेत, तसेच बरे होणार्‍या रूग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 77 लाख संक्रमित प्रकरणे समोर आली आहेत, ज्यापैकी 68 लाखपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. पीटीआयने रात्री उशीरा जारी केलेल्या आकड्यांनुसार, मागील 24 तासादरम्यान 55,871 नवीन केस सापडल्या आहेत, 82,062 रूग्ण बरे झाले आहेत आणि 714 लोकांचा मृत्यू झाला आहे.