फेक न्यूजची पण हद्द झाली ; ‘या’ स्टार्सच्या मृत्यूच्या बातम्या झाल्या व्हायरल..

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मिडिया एक असे माध्यम आहे. तिथे कुठली बातमी लोकांनपर्यंत पोहचायला वेळ लागत नाही. काही सेकंदात एक बातमी दुसरीकडे पसरते. सकारात्मक फायद्यांसह काही नकारात्मक तोटे देखील आहेत. इथे कुठली पण गोष्ट लगेच व्हायरल होते. बॉलीवूडमधील काही स्टार्सला जिवंत असतांना देखील मारले जाते. आत्ता सध्या अशी बातमी आली आहे की, ऋतिक रोशनची बहीण सुनैना ची तबेत खूप क्रिटिकल आहे. ही गोष्ट सगळीकडे व्हायरल झाली होती.

जेंव्हा या बातमीची भनक सुनैनाला लागली तेंव्हा तिने सांगितले की, या सर्व बातम्या चुकीचा आहेत. या आधी ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि माधुरी दीक्षित यांच्या निधन वार्ताच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.

‘या’ बॉलीवूड स्टारच्या निधनाची बातमी देखील व्हायरल झाली होती –

ऐश्वर्या राय- काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अचानक एक बातमी व्हायरल झाली होती की, ऐश्वर्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. असे सांगितले जात होते की, अमिताभ बच्चन आणि जया बच्चनसोबत वाद झाल्यामुळे ऐश्वर्याने हे पाऊल उचलले. ही बातमी खरी आहे असे कबुल करून देण्यासाठी एका महिलेचा फोटो व्हायरल केल्या गेला होता. ती हॉस्पिटलच्या बेड वर होती. आणि ही बातमी खोटी असल्याचे उघड झाले.
aishwarya rai

अमिताभ बच्चन – २०१२ मध्ये अशी बातमी आली होती की, एका कार अक्सिडेंटमध्ये अमिताभ चा मुत्यु झाला. एका ब्लॉगमध्ये कार दुर्घटनेचा दावा केला गेला.  हा ब्लॉग इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. परंतु काही काळानंतर ही एक बनावट बातमी आली आहे असे कळाले.
amitabh bacchan

माधुरी दीक्षित- माधुरी देखील या बनावट अफवांची बळी  झाली होती. हृदयविकाराच्या झटक्यामुळे माधुरी दीक्षित यांचे निधन झाले. अशी बातमी व्हायरल झाली होती. ही बातमी इतकी व्हायरल झाली होती की, माधुरीला स्वतः समोर येऊन सांगावे लागले की हे बातमी खोटी आहे.
madhuri dixit

लता मंगेशकर- बंगाली अभिनेत्री नंदा यांच्या मृत्यूनंतर लता मंगेशकरच्या मृत्यूची अफवा उडाली होती. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. शेवटी लता मंगेशकरने स्वतः ट्विटर च्या माध्यमातून ही बातमी खोटी आहे असे सांगितले.
lata didi

दिलीप कुमार- दिलीप कुमार अनेक वेळा या बनावट बातम्यांचे बळी झाले आहेत. 2013 मध्ये त्यांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही पहिलीच वेळ होती दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी समोर आली होती.
dilip kumar

शाहरुख खान- एका युरोपियन न्युज नेटवर्कने एका रिपोर्ट मध्ये दावा केला होता की, विमान क्रॅश झाल्यामुळे शाहरुखचा मुत्यू झाला. ही अफवा तेव्हा उडाली जेव्हा शाहरुख मुंबई मध्ये चित्रपटाच्या शुटिंग मध्ये होता.
srk

आरोग्यविषयक वृत्त

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

You might also like