Video : ‘किंग’ खानच्या घरात राहण्याची चाहत्यांना मोठी संधी ! जाणून घ्या काय करावं लागेल

पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हाला जर शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या बंगल्यात राहायचं असेल, तर तुम्हाला ही संधी मिळू शकणार आहे. म्हणजे तुम्ही शाहरुख आणि गोैरी (Gauri Khan) यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यात राहू शकता. गौरीनं तिच्या इंस्टावरून याबाबत पूर्ण माहिती दिली आहे.

गौरीनं इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्या दिल्लीवाल्या बंगल्याची झलक दाखवण्यात आली आहे. जो गौरीनं डिझाईन केला आहे. तुम्ही त्यांच्या या घरात गेस्ट बनून राहू शकता, अशी माहिती तिनं कॅप्शनमध्ये दिली आहे. फक्त तुम्हाला एक कॉन्टेस्ट जिंकायची आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार शाहरुख आणि गौरी यांना घर मिळवून देणारी संस्था एअर बीएनबी (Air bnb) सोबत हात मिळवला आहे. याच्या अंतर्गत त्यांनी एका कॉन्टेस्टचं आयोजन केलं आहे.

या स्पर्धेत लोकांना ओपन आर्म वेलकम म्हणजे काय ते सांगावं लागणार आहे. चाहत्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत याचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर कुठे आणि कसं द्यायचं हे गौरीनं तिच्या पोस्टमधून सांगितलं आहे. ज्या 2 लोकांचं उत्तर सर्वांत चांगलं असेल त्यांना पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये व्हॅलेंटाइनच्या निमित्तानं 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी शाहरुख आणि गौरीच्या साऊथ दिल्लीवाल्या आलिशान घरात थांबवण्याची संधी मिळणार आहे.

व्हिडिओ शेअर करताना गौरी म्हणते, आमचं दिल्लीतलं घर हे आमच्या सुरुवातीच्या आठवणींनी भरलं आहे. जे आम्हाला खूप वर्षांनी मिळालं आहे. हे घर माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.

You might also like