ED कडून ‘किंग’ खान शहारूख-गौरी वर मोठी कारवाई, कोट्यावधी रूपयांची संपत्ती ‘जप्त’, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने अनेक प्रयत्न करूनही त्याच्या सिनेमांमुळे चाहते निराश होताना दिसत आहेत. अशात आता त्याच्यावर आणखी एक संकट आलं आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्या कंपन्यांना रोज व्हॅली ग्रुपकडून फंड मिळत होता अशा विविध कंपन्या आणि व्यक्तींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या घोटाळ्यात 70 कोटींहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणी मल्टीपल रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, सेंट झेवियर कॉलेज, कोलकाता आणि कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवर ही कारवाई केली आहे. तिन्ही कंपन्यांची बँक खाती सील करण्यात आली आहे ज्यात एकूण 16.20 कोटी आहेत.

ईडीचं म्हणणं आहे की, रोझ व्हॅली घोटाळा हा शारदा चिट फंड पेक्षाही मोठा आहे. रोझ व्हॅली घोटाळ्यात लोकांना वेगवेगळ्या स्किमचं आमीष दाखवलं गेलं. यात अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्यात कपंनीनं लोकांकडून 17520 कोटी रुपये उकळले होते. यातील 10850 कोटी लोकांना परत करण्यात आले होते. यापैकी 6670 कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सच्या लोकांनी औपचारिकपणे म्हटलं आहे की, शाहरुख खान आणि गौरी खानचा याच्याशी काही संबंध नाही.