शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन लवकरच पडद्यावर दिसणार आहे. आर्यनच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. शाहरुखचा मुलगा लवकरच पडद्यावर दिसावा अशी त्याच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. लवकरच शाहरुखचा मुलगा आर्यन बॉलिवूड डेब्यू करणार आहे परंतु या सिनेमात तो दिसणार नाही तर फक्त त्याचा आवाज आपण ऐकू शकणार आहोत.

अशी माहिती समोर आली आहे की, लायन किंग या सिनेमात शाहरुख खान आणि आर्यन एकत्र काम करणार आहेत. डिजनी या आंतरराष्ट्रीय कंपनीने 3 वर्षांपूर्वी रिलीज केलेला द जंगल बुक हा सिनेमा भारतातही खूप चालला. यानंतर असाच एक सुपरहिट सिनेमा द लायन किंगचाही पुढचा पार्ट पुढील महिन्यात रिलीज केला जाणार आहे. लायन किंगच्या या भागात अ‍ॅनिमेशनचा प्रयोग करण्यात आला आहे. या सिनेमाची चाहते खूप दिवसांपासून वाट पहात आहेत.

या सिनेमातील स्टोरी ही जंगलचा राजा मुस्तफा आणि त्याचा मुलगा सिंबा यांच्यावर आधारीत आहे. द लायन किंगच्या हिंदी वर्जनला मुस्तफासाठी शाहरुख खानचा आणि सिंबासाठी शाहरुखचा मुलगा आर्यनचा आवाज दिला जाणार आहे. शाहरुखने याच्याशी संबंधित एक फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात टीशर्ट घातलेले दोघे दिसत आहेत. त्यांच्या टीशर्टवर मुस्तफा आणि सिंबा असं लिहिलं होतं. हा फोटो शेअर करत किंग खानने लिहिले होते की, “#FathersDay च्या भावनेसोबत मॅचसाठी तयार. गो इंडिया गो.”

 

Loading...
You might also like