सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘किंग’ खानची लेक सुहानाचा ‘जलवा’, टेबलवर बसून ‘डान्स’ करताना ‘स्पॉट’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडिया आजकाल सेलिब्रेटींच्या मुलांच्या बातम्यांनी भरलेले आहे. रोज आपल्याला कलाकारांच्या मुलांच्या कोणत्यानाकोणत्या तरी बातम्या वाचायला मिळतात. सोशल मीडियाकडे पाहता असे दिसते की आता बॉलिवूडने नवीन पिढी सुरू केली आहे. आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखल्या जाणारा शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानला सध्या हेडलाइट्समध्ये ठेवले आहे. तिचे अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की सुहाना एका टेबलाजवळ बसली आहे आणि बसलेली असताना नाचत आहे. चाहत्यांना तिची मुव्हमेंट खूप आवडली आहे. ती डान्सबरोबरही गाणे गात आहे. सुहानाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी तिने राखाडी रंगाचा टॉप घातला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

किंग खानच्या मुलीची ही स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहाना सध्या बॉलिवूडपासून खूप दूर आहे पण तिची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात. जेव्हा जेव्हा इंटरनेटवर सुहानाचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ येतो तेव्हा काही तिचा व्हिडिओ व्हायरल होतो.

अलीकडेच सुहानाचा आणखी एक व्हिडिओ त्या चर्चेत आला होता ज्यामध्ये ती एका पार्टीत आपल्या मित्रांसह मस्ती करताना दिसत होती. या व्हिडिओला काही दिवसच झाले आहे तर लेगच तिचा दुसरा व्हिडिओ चाहत्यांच्या समोर आला आहे.