Video : शाहरुख खानची मुलगी सुहानाने बहिणीला केले स्पेशल बर्थडे विश

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच तिच्या स्टाईलबद्दल चर्चेत असते. ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. आज सुहानाची चुलत बहीण आलिया चिबाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने सुहानाने बहीण आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये सुहाना आणि आलिया खूप आनंदी दिसत आहेत.

सुहानाने शेअर केला बुमरॅंग व्हिडिओ
सुहानाने एक बूमरांग व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने लिहिले , “माझी बहिण आलियाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि, आलियाने ब्लॅक ड्रेस घातला असून सुहानाने प्रीटेन्ड शर्ट आणि जीन्स घातली आहे. या व्हिडिओत दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. सुहानाच्या या पोस्टवर तिचे चाहतेही आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

सुहाना आणि आलिया दोन्ही बहिणी बऱ्याचदा एकत्र दिसतात. ते एकमेकींच्या अगदी जवळ आहेत. सुहानाची बहीण आलियासुद्धा तिच्यासोबत फोटो शेअर करत असते. आलीय सुहानाच्या कुटूंबासह, आयपीएल 2020 च्या वेळी दुबईला देखील गेली होती. आलियाने दुबईतील बुर्ज खलिफा येथील सुहानासोबत काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना आलियाने लिहिले की, ” फॉलो द डिस्को बॉल.” तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुहानाने कमेंट केली, “हाहााहा लव यू.”

दरम्यान, सुहाना लवकरच शिक्षण संपल्यानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. एका मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला कि, ‘अभिनेत्री बनण्यापूर्वी सुहानाला तीन ते चार वर्षे अभिनय शिकावा लागेल. मला माहित आहे चित्रपटसृष्टीतील माझ्या बर्‍याच मित्रांना असे वाटते की आतापासूनच माझ्या मुलांनी अभिनय करण्यास सुरवात केली पाहिजे. पण माझा विश्वास आहे की, त्यांनी आताच अभिनयाच्या क्षेत्रात काम करू नये ‘.