Video : ‘किंग खान’ला पाहून ‘ढसा-ढसा’ रडू लागला चाहता, प्रचंड व्हायरल झाला व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्याला भेटल्यानंतर एक चाहता थेट ढसाढसा रडू लागला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, शाहरुख खान चाहत्यांच्या गर्दीमधून जात आहे. इतक्यात एक चाहता त्याला भेटायला पुढे येतो आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आहे. परंतु यावेळी हा चाहता खूप भावूक होताना दिसला. त्याला अश्रू अनावर झाले आणि तो रडू लागला.

व्हिडीओत दिसतंय की, त्याला शाहरूखसोबत सेल्फी घ्यायचा आहे. सेल्फी घेताना त्याला रडू आलं आहे. तसं पाहिलं तर शाहरूख खानचा हा व्हिडीओ जुनाच आहे. परंतु नव्यानं व्हायरल होत आहे. शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.