‘या’ विद्यार्थीनीला मिळाली ‘किंग’ शाहरुख खानच्या नावानं सुरू केलेली पहिली स्कॉलरशिप (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केरळची गोपिका कोट्टनथारायिल ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या नावावर ठेवण्यात आलेली शाहरुख खान ला ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी स्कॉलरशिप मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. गोपिका पशु विज्ञान आणि शेतीच्या नव्या प्रथांना विकसित करण्याच्या दिशेनं काम करत आहे. विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या 800 हून अधिक भारतीय महिलांपैकी गोपिकाची निवड झाली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या एका इव्हेंटमध्ये शाहरुखनं स्वत: ही स्कॉलरशिप गोपिकाला प्रदान केली आहे.

असं सांगितलं जात आहे की, इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्न आणि ला ट्रोब युनिव्हर्सिटीनं गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2019 मध्ये शाहरुख खान ला ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी स्कॉलरशिपची घोषणा केली होती. याबाबत बोलताना शाहरुख म्हणाला, “मी गोपिकाचं समर्पण आणि तिच्या निर्धाराचं कौतुक करतो. ही स्कॉलरशिप तिला मेलबर्नचा प्रवास करण्यास सक्षम बनवेल जिथे ती भारताच्या कृषी क्षेत्राला आणखी चांगलं बनवण्यात मदत करण्याच्या आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करेल.” यावेळी बोलताना शाहरुखनं गेल्या वर्षी आपला मेलबर्न फिल्म फेस्टीवलमधील अनुभव देखील सांगितला.

या इव्हेंटमध्ये शाहरुख खानव्यतिरीक्त इतरही अनेक स्टार्स उपस्थित होते. मलायका अरोरा, सिद्धार्थ रॉय कपूर, श्रीराम राघवन हेही कलाकार या समारंभासाठी आले होते. युनिव्हर्सिटीचे कुलपती जॉन ब्रम्बी यांनी यावेळी आपली उपस्थिती दर्शवली.