‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि नवाजुद्दीनसह ‘या’ सुपरस्टार्सचे स्ट्रगलचे किस्से ऐकून अवाक् व्हाल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बी अमिताभपासून तर किंग शाहरुख खानपर्यंत सर्वांनीच मोठं होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज आपण अनेक अभिनेत्यांच्या स्ट्रगल लाईफबद्दल थोडक्यात काही किस्से जाणून घेणार आहोत.

1) शाहरुख खान – एका मुलाखतीत शाहरुखनं आपल्या स्ट्रगलबद्दल सांगितलं. शाहरुख म्हणाला, “मी आधी थिएटरच्या बाहेर तिकीट विकण्याचं काम केलं होतं. यासाठी मला 50 रुपये मिळायचे. हे 50 रुपये घेऊन मी एकद ताज महाल फिरायला गेलो होतो. माझ्याकडे फक्त एवढेच पैसे राहिले होते की, मी पिंक लस्सी विकत घेईल. मी पिंक लस्सी घेतली आणि त्यातही माशी पडली. मी तिला बाजूला करून ती पिली. आणि पूर्ण रस्त्यानं उलटी करत गेलो.

2) कार्तिक आर्यन – ग्वालियरचा कार्तिक एका मुलाखतीत बोलताना म्हणाला होता की, “मी मुंबईत आलो तेव्हा पीजीमध्ये राहयचो आणि एका प्लॅटमध्ये 12 लोक रहायचो. ही एक अशी गोष्ट होती जिचा मी कधी विचार केला नव्हता. ग्वालियरला एवढ महाग नाही. मुंबई खूपच महाग होती.” अॅक्टर झाल्यानंतर कार्तिकनं सर्वात आधी मुंबईत अपार्टमेंट खरेदी केलं. कार्तिक नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आहे.

3) राजुकमार राव – राजकुमार राव देखील नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की, “मी मुंबईत जिथं रहायचो तिथं 7000 भाडं होतं जे मला खूप वाटत होतं. मला 15 ते 20 रुपयांची गरज असायची. कधी कधी तर पैसे अजिबातच नसायचे. कधी कधी मी मित्राच्या घरी जाऊन जेवण शेअर करायचो. माझ्याकडे नीट कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नसायचे. माझ्या अॅक्टर मित्र आहे विनोद. त्याच्या गाडीवर आम्ही ऑडिशन द्यायला जायचो. मला ड्रेसिंगबद्दल जास्त काही कळत नव्हतं.

4) पंकज त्रिपाठी – पंकज आता 40 वर्षांचे झाले आहेत जेव्हा त्यांना यश मिळालं आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, बॉलिवूडमध्ये नशीब आजमावताना 1993 मध्ये त्यांची आणि मृदृलाची भेट झाली. 2004 मध्ये दोघांनी लग्न केलं. पंरतु त्यांच्या कडे घराच्या भाड्यासाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांनी मृदृलाला हॉस्टेलवरच ठेवलं होतं.

ते सांगतात, “बॉईज हॉस्टेलमध्ये मुली अलाऊ नव्हत्या मी एनएसडी पास होण्याआधीच लग्न केलं. मग मृदृला चोरून माझ्याकडे रहात होती. माझी पत्नी सोबत असल्यानं मुलं कपडे वगैरे पण नीट घालत होते. एकदा तर वार्डनला हे कळालं होतं. तिनं मला विचारलं की, तू भाड्याच्या शिफ्ट कधी होतोस.

5) नवाजुद्दीन सिद्दीकी – मुंबईत आलो तेव्हा माझी आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मी मित्रांकडून पैसे उधार घेत असे आणि म्हणायचो दोन दिवसात परत देतो. मी चार लोकांसोबत एका फ्लॅटमध्ये रहात होतो. मी फक्त एवढच पहात होतो की सर्वाइव करणं. यावेळी अनेक जॉब्सही केले. कधी चौकीदार तर कधी सेल्समन बनलो. अ‍ॅक्टींग वर्कशॉप्सही चालवले. 100 पेक्षा जास्त ऑडिशन दिले. जे रोल मिळाले मी करत गेलो. प्रॉपर ब्रेक मिळण्यासाठी मला 12 वर्षे लागली अस नवाज सांगतो.

6) अमिताभ बच्चन – एक वेळी अशी होती जेव्हा अमिताभ बच्चनला नोकरी मिळत नव्हती. त्यांच्या आवाजामुळं त्यांना ऑल इंडिया रेडिओमध्येही काम नाही मिळालं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी लायसन्स सहित मुंबईला आलो होतो. ठरवलं होतं. जर अ‍ॅक्टर नाही झालो तर टॅक्सी चालवेल. पैसे नसल्यानं अनेक रात्र मी मरीन ड्रईवच्या बेंचवर झोपलो. त्यांनी रेडिओ स्पॉटही केले आहेत. रेडिओवर अ‍ॅड्स व्हायच्या त्यांना 50 रुपये मिळायचे. सात हिंदुस्तानी या पहिल्या सिनेमातून त्यांना 5000 रुपये मिळाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like