Shahrukh Khan | ‘त्या’ वक्तव्यावर शाहरुख खानने दिले स्पष्टीकरण; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या चर्चेत आहे. त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathan) चित्रपटावरून शाहरुख सोशल मीडियावर वायरल होत होता. तर आता त्याच्या वक्तव्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. बॉलिवूड चित्रपट बॉयकॉट केले जात असताना शाहरुख खानला याची भीती नसल्याचे वक्तव्य त्याने केले होते. आता या वक्तव्यावर त्याचे स्पष्टीकरण देखील समोर आले आहे. (Shahrukh Khan)

 

शाहरुख खानला ‘शारजाह इंटरनॅशनल बूक फेअर’ (‘Sharjah International Book Fair’) या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील योगदान आणि ग्लोबल आयकॉन म्हणून गौरवण्यात आले होते. यावेळी त्याची मुलाखत देखील घेण्यात आली होती. या मुलाखतीत त्याला “तुला तुझे आगामी चित्रपट हिट होतील की नाही अशी चिंता वाटते का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर बोलताना शाहरुखने, “मला माझ्या आगामी चित्रपटाची काळजी करण्याची गरज नाही कारण ते सर्व सुपरहिट चित्रपट असणार” असे विधान केले होते. त्यानंतर शाहरुख चे हे विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होऊ लागले. (Shahrukh Khan)

 

यावर शाहरुख खान स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझे हे विधान काही मी ओव्हर कॉन्फिडन्स किंवा उद्धटपणे बोललेले नाही. मला खात्री आहे हा चित्रपट सुपरहिट होईल यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी अगदी लहानपणापासूनच असे मानत आलो आहे की आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली की त्यात नक्कीच आपल्याला यश मिळते. माझ्या लहानपणी मी खूप मेहनत करायचो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी यासाठी चांगले गुण देखील मिळाले आहेत अगदी तोच लॉजिक इथेही लागू होतं”.

यापुढे बोलताना तो म्हणाला, “मी लहान असताना एकदा मला गणिताच्या पेपरला चांगला अभ्यास करूनही कमी गुण मिळाले होते.
पण मी खरोखरच त्यावेळी चांगली मेहनत घेतली होती. असे अनेकदा चित्रपटाच्या बाबतीत देखील होते.
‘झिरो’ (Zero) चित्रपटाच्या वेळी देखील मी चांगली मेहनत केली होती आणि तितकीच मेहनत मी
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाच्या वेळी देखील घेतली होती.
मात्र झिरो हा चित्रपट फ्लॉप झाला तर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट सुपरहिट झाला आहे.

 

तब्बल तीन वर्षानंतर शाहरुख खान ‘पठाण’ (Pathan), ‘डंकी’ (Dankie) आणि ‘जवान’ (Jawan) यांसारख्या
चित्रपटांसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे त्याचे चाहते या तिन्ही चित्रपटांसाठी प्रचंड उत्सुक दिसत आहेत.
तर आता येणाऱ्या काळच ठरवेल की शाहरुख म्हणतो तसे त्याचे चित्रपट सुपरहिट होणार की नाही.

 

Web Title :- Shahrukh Khan | shahrukh khan revealed the reason behind his statement about his upcoming films

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी