किंग खानच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक 

मुंबई :वृत्तसंस्था – आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींविषयी प्रत्येक जणांना जाणून घ्यायची उत्सुकता असते हे सेलिब्रेटी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून हे सेलिब्रेटी सतत फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आणि या सेलिब्रिटींचे ट्विटर व फेसबुक अकाऊंट सतत हॅक होण्याच्या घटनाही घडत असतात.

आता मात्र एका सेलिब्रेटी किड चे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान चे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे याची माहिती खुद्द आर्यनने चाहत्यांची शेअर केली. माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. त्यामुळे या अकाऊंटवरुन कोणताही मेसेज, फोटो वा पोस्ट शेअर झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा, अशी पोस्ट आर्यनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.

यापूर्वीही अनेक सेलेब्रेटींचे अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. शाहिद कपूर, अनुपम खेर, ऋषी कपूर, अभिषेक बच्चन, महेश भट्ट, करण जोहर, श्रुती हासन आणि अली जफर या सेलिब्रिटींचा  समावेश आहे.