शाहरुख खानचं शुटिंग चालू होतं, मध्येच पोलिसांनी केली होती अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने नेटफ्लिक्सवर प्रसारित केल्या जाणाऱ्या अमेरिकन होस्ट डेव्हिड लेटरमॅन यांच्या चॅट शोमध्ये सहभाग घेतला. या शो दरम्यान शाहरुखने आपल्या आयुष्यातील अनेक किस्से तसेच व त्याच्या आयुष्यातील चढउतारावर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. काही वर्षांपुर्वी एका संपादकांवर रागवल्या प्रकरणी शाहरुखला अटक करण्यात आली होती. दरम्यान काही वेळासाठी शाहरुखला तुरंगात सुध्दा जावं लागलं होते.

या प्रकरणा विषयी शाहरुख शो मध्ये खुलासा करताना सांगत होता की, त्याच्या करिअरच्या सुरूवातीला एका मासिकात त्याच्याविषयी एक आर्टिकल छापण्यात आले होते. त्यामध्ये जे काही लिहीण्यात आले होते ते सहन करण्यापलिकडे होतं. दरण्यान या आर्टिकलविषयी शाहरुखला समजल्यावर तो त्या मासिकाच्या संपादकांना याविषयी विचारणा करायला गेला. त्यावेळी त्या संपादकांनी जे उत्तर दिले की, तुम्ही हे एवढं मनावर घेऊ नका ही फक्त मस्करी होती. त्यावर शाहरुखला राग अनावर झाला. त्याला ही बाब अजिबात आवडली नाही. तेव्हा शाहरुख त्या संपादकास उध्दटपणे वाटेल ते बोलला आणि निघून गेला.

हे प्रकरण ऐवढ्यावरच न थांबता एक दिवस शाहरुख एका सिनेमाचं शुट करत होता. दरम्यान पोलीस त्या ठिकाणी आले काही प्रश्न विचारायचे म्हणुन घेऊन गेले. त्यानंतर शाहरुख सरळ जेलमध्ये पहायला मिळाला. असे शाहरुख ने शो दरम्यान सांगितले. पुढे बोलताना ती जागा खूपच वाईट होती आणि लहान सुध्दा. तसेच तिथे खूप वाईट लोक राहतात. असे शाहरुख या चॅट शो दरम्यान सांगितले.

Visit : policenama.com