‘…तेव्हा मी मुलगा अबरामसोबत सिनेमात काम करेन’ : किंग खानचा खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानला जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. कधी इंस्टाग्राम तर कधी ट्विटरवर शाहरुख खान, #AskSRK हा हॅशटॅग वापरत चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी देतो. तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरंही देत असतो. नुकताच त्याने दसऱ्याच्या निमित्ताने चाहत्यांशी पुन्हा संवाद साधला. यावेळी त्याने आपण मुलगा अबराम सोबत काम कधी करणार याचा खुलासा केला आहे.

मुलगा अबरामसोबत कधी करणार काम ?
#AskSRK च्या माध्यमातून एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, “तू अबराम सोबत सिनेमात कधी काम करणार ?” यावर त्याने खूप गंमतीशीर उत्तर दिलं. शाहरुख म्हणाला, “जेव्हा मला त्याच्या डेट्स मिळतील तेव्हा मी त्याच्यासोबत नक्की काम करेन.” अबरामला तुझा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो असा प्रश्न विचारला असता शाहरुखने सांगितले, अबरामला त्याचा ‘रा.वन’ हा सिनेमा सर्वात जास्त आवडतो.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

Visit : Policenama.com

 

You might also like