#Video : अशा’ लुक मध्ये पहिल्यांदाच दिसली शाहरुख खानची लाडकी सुहाना खान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या स्टाइलमुळे नेहमीच सगळ्यांच्या चर्चेत असते. सुहाना खान सध्या सोशल मीडियाच्या चर्चेत आहे. सुहानाचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोज मध्ये सुहाना आपल्या बहिणींसोबत फॅमिली वेडिंग एन्जॉय करतांना दिसून येत आहे. फोटोमध्ये सुहानाने तिचा हातावर मेहेंदी लावली आहे. सुहानाने सलवार सूट घातला आहे. मॅचिंग ओढणी, ईयररिंग्स आणि मोकळे केस सोडून सुहानाने आपला लुक छान केला आहे.

https://www.instagram.com/p/ByDW5jxBFFF/?utm_source=ig_embed

इंटरनेट वर फोटोज आल्यानंतर ते सगळीकडे व्हायरल झालेत. तिच्या चाहत्यांनी कंमेंट करत तिच्या लुकचे कौतुक केले. आणि एका चाहत्याने असे लिहिले की ‘पाहिल्यावेळेस सुहाना ट्रेडिशनल लुक मध्ये, हा लुक तिला चांगला वाटत आहे. शेयर केलेल्या व्हिडीओ मध्ये सुहाना तिच्या फ्रेंड्ससोबत मेहेंदी काढतांना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByC_2G8BffT/?utm_source=ig_embed

काही दिवसांपूर्वी सुहानाचा पार्टी मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही फोटोज मध्ये ती फ्रेंड्ससोबत सेल्फी घेतांना दिसते आहे तर काही फोटोज मध्ये फ्रेंड्ससोबत हातात ग्लास धरून उभी आहे. सुहाना तिच्या फिटनेसआणि आउटफ‍िटमुळे खूप प्रसिद्ध आहे.