मांजरी गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शैलेंद्र बेल्हेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मांजरी बुद्रुक महात्मा गांधी गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शैलेंद्र बेल्हेकर यांची निवड करण्यात आली. तसेच, सत्यवान घुले व रोहित गायकवाड या दोन उपाध्यक्षांचीदेखील निवड करण्यात आली. मांजरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली.

सरपंच शिवराज घुले, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, नगरसेविका उज्वला जंगले, उपसरपंच सीमा घुले, पंचायत समिती सदस्य जितिन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब धारवाडकर, अमित घुले, समीर घुले, उज्वला टिळेकर, सुनीता घुले, निर्मला म्हस्के, सुमित घुले, नयना बहिरट, जयश्री खलसे, संजय धारवाडकर, बाळासाहेब घुले, बबन जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.