Shakeela Trailer : ऋचा चड्ढा आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘द डर्टी पिक्चर’ आहे ‘शकीला’ ! ‘या’ दिवशी होणार रिलीज

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा शकीला (Shakeela) हा आगामी सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. आगामी ख्रिसमस ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. साऊथ इंडियन सिनेमातील एक अ‍ॅडल्ट स्टार शकीला च्या बायोपिकवर आधारीत हा सिनेमा आहे. ऋचानं यात शकीलाची भूमिका साकारली आहे. नुकताच सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये ?

ट्रेलरनुसार, साऊथमधील चर्चित आणि वादग्रस्त अ‍ॅडल्ट स्टार सिल्क स्मिता (Silk Smitha) च्या डेथ नंतर शकीलाची कहाणी सुरू होती. सिल्क गेल्यानंतर इंडस्ट्रीत तिची जागा कोण घेणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. एका साध्या मुलीपासून तर सुपरस्टारडमपर्यंतचा प्रवास करते.

ट्रेलरमधील ऋचाचा अंदाज पाहिल्यानंतर द डर्टी पिक्चर (The Dirty Picture) मधील विद्या बालन (Vidya Balan)ची आठवण येते. हा सिनेमा सिल्क स्मितावर आधारीत होता.

90 च्या दशकात मल्याळम सिनेमात होतं मोठं नाव

शकीला मल्याळम सिनेमातील अशी पहिली महिला अ‍ॅक्ट्रेस होती जिनं पुरुषांचं वर्चस्व असताना लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं. 90 च्या दशकात या अ‍ॅक्ट्रेसनं हॉट आणि बोल्ड सीन्स देऊन मल्याळम सिनेमात खळबळ उडवून दिली होती.

5 भाषा आणि 1000 स्क्रीन्सवर रिलीज होणार सिनेमा

मीडिया रिपोर्टनुसार शकीला हा सिनेमा हिंदी व्यतिरीक्त तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत 1000 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.