श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नानंतर लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. वरुणनं आता श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) च्या लग्नाचे संकेत दिले आहेत. वरुण-नताशाच्या लग्नानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अशात सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ (Rohan Shrestha) यानंही वरुणला शुभेच्छा दिल्या. वरुणनं रिप्लाय करत म्हटलं की, आशा आहे की, पुढचा नंबर तुमचा असेल. रिपोर्टनुसार, रोहन आणि श्रद्धा एकमेकांना डेट करत आहेत. वरुणच्या त्या कमेंटनंतर आता श्रद्धा आणि रोहन यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता तिचे वडिल अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शक्ती कपूरची नाही कसलीच हरकत
शक्ती कपूर यांनी या चर्चांवर बोलताना सांगितलं की, श्रद्धा तिचा जीवनसाथी म्हणून कुणाची निवड करते याबद्दल आमची कसलीही हरकत नाही. या नात्याबद्दल त्यांना जास्त काही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते या नात्याबद्दल सीरियस आहेत किंवा नाही हेही माहिती नसल्याचं शक्ती यांनी म्हटलं आहे.

श्रद्धा कपूरच्या लग्नावर पप्पा शक्ती कपूरची रिॲक्शन
एका मुलाखतीत बोलताना शक्ती कपूर म्हणाले, ते कायमच श्रद्धा सोबत उभे राहतील आणि ती ज्यासोबत लग्न करेन त्याचंही समर्थन करतील. ते म्हणाले रोहन श्रेष्ठच नाही तर तिनं येऊन जर सांगितलं की, तिनं कुणाची दुसऱ्याची निवड केली आहे आणि तिला त्याच्यासोबच आयुष्य घालवायचं आहे तरी मला काही प्रॉब्लेम नाही.

शक्ती यांनी केलं रोहनचं कौतुक
कपूर आणि श्रेष्ठ यांच्या चांगले संबंध आहे. शक्ती कपूर या मुलाखतीत पुढं बोलताना म्हणाले, रोहन खूप चांगला मुलगा आहे. तो घरीही येतो. आताच नाही तर लहान होता तेव्हापासून येत आहे. श्रद्धानं मला सांगितलं की, ती लग्नाबद्दल विचार करत आहे. माझ्यासाठी ते आजही लहानपणीचे मित्र आहेत. मला काहीच अंदाज नाहीयेत की, ते एकमेकांप्रति जरीही सीरियस आहेत किंवा नाही.

रोहन श्रेष्ठ बनणार नवरदेव ?
रोहननं इंस्टा स्टोरीला वरुण आणि नताशाचा फोटो पोस्ट करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वीडी तू खूप नशीबवान मुलगा आहेस असं तो म्हणाला आहे. याला रिप्लाय करताना वरुणनं रोहनला विचारलं की, काय आता तूही तयार आहेस का. यानंतरच सर्वांना वाटू लागलं की, आता रोहन देखील नवरदेव बनणार आहे.

अनेकदा समोर आल्यात लग्नाच्या चर्चा
अनेक मीडिया रिपोर्ट्सने खूपदा असा दावा केला होता की, शक्ती कपूरची लाडकी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न करणार आहे. एवढेच काय तर तिच्या लग्नाचा टाईमदेखील सांगितला जात होता. या रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात होतं की, श्रद्धा आपल्या लाँग टाईम बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा सोबत लग्न करणार आहे. श्रद्धानं कधीच यावर काही भाष्य केलं नाही.