Shalini Patil | जरंडेश्वरच्या व्यवहारावरून शालिनी पाटलांचा घणाघात, म्हणाल्या – ‘अजित पवार खोटं बोलतात, सत्य वेगळंच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (Ajit Pawar) संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) तसेच निकटवर्ती यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापे मारले (Income tax department raid) आहेत. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणावर माजी मंत्री शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवार खोटं बोलत असून ते माहिती लपवत असल्याचा आरोप शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या काही कंपन्यावर आज देखील आयकर विभागाचे छापे सुरुच आहे. यावरुन शालिनी पाटील (Shalini Patil) यानी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला आहे. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे.
आयकर विभागाने माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे.
ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी शालीनी पाटील यांनी केली.

न्यायालयीन लढाई सुरुच

अजित पवार यांच्यावर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वर साठीच पडल्या आहेत. न्यायालयात माझी लढाई सुरु आहे.
साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळणार, असं देखील शालीनी पाटील यांनी सांगितले.

 

Web Title : Shalini Patil | Shalini Patil lashes out at Jarandeshwar’s behavior, says – ‘Ajit Pawar lies, truth is different’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | व्यावसायिकाची 97 लाखाची रोकड चोरणारी दुकली गजाआड; पुणे व नगर पोलिसांची संयुक्त कारवाई

Kolhapur Ambabai Temple | अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी सासऱ्यासह जावयाला ठोकल्या बेड्या

Pune Crime | 83 लाख रुपये घेऊनही विवाहितेचा छळ, महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक