Shalinitai Patil । पवारांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप; शालिनीताई म्हणाल्या – ‘देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच’

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यामधील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर (Jarandeshwar Cooperative Sugar Factory, Satara) सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) कारवाई करण्यात आली आहे. हा साखर कारखाना (Sugar Factory) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ED ने केलेली कारवाई अजित पवारांना (Ajit Pawar) एक धक्का असल्याचं समजतं. तर या कारवाईवरून जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून हा कारखाना (Sugar Factory) बळकावल्याचा आरोप करत देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच, असं शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाल्या शालिनीताई?

आमच्या कारखान्यावर कर्जाचा हफ्ता फक्त तीन कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक पाहता आमच्या खात्यात आठ कोटी रुपये होते. परंतु, बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार (Ajit Pawar) त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. त्यांनी 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. मात्र, थोडा उशीर झाला पण आम्हाला न्याय मिळाला असल्याच शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) म्हणाल्या.

आम्ही 4 जणांनी अर्ज केला होता. 2019 मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी FIR दाखल करुन ED ने घेतली होती. त्यांनी मान्य केलं होतं की भ्रष्टाचार झाला होता. मला आनंद आहे 27 हजार सभासदांना न्याय मिळाला आहे. लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला एकदा सोडला तर कधीच निवडणूक कारखान्यात झाली नव्हती. तसंच पुढं त्या म्हणाल्या, कोर्ट माझ्यापाठी पहिल्यापासून लागलं होतं. कारण यांनी माझी कामं कधी होऊ दिली नाहीत. म्हणून मला सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) मदत घ्यावी लागली होती. मी सत्यमेव जयतेवर विश्वास ठेवते,असं देखील शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) म्हटलं आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) 43 कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजेची मागणी केली होती. त्यावरून त्या म्हणाल्या की, ‘राजू शेट्टी यांचं म्हणणं बरोबर आहे. सर्वात पहिला नंबर आमच्या कारखान्याचा होता. आता अन्य देखील सुरुवात होईल. 43 पैकी 38 कारखाने राष्ट्रवादीकडे (NCP) आहेत. कुठून आला पैसा. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

काय आहे प्रकरण?

कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जप्त केला.
हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांचा आहे.
ED ने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ED ने 2019 रोजी मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा (FIR ) दाखल करण्यात आला होता.

Web Titel :-  shalinitai patil s first reaction on ed s action on jarandeshwar sugar factory and allegations on ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू