Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Shalmali Kholgade | बॉलिवूडमध्ये सध्या लगीनसराई जोरदार चालू आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नानंतर लवकरच प्रसिद्ध बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) लग्नबंधनात अडकली आहे. तिनं बॉयफ्रेंड फरहान शेख सोबत 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली.

 

शाल्मली खोलगडे हीनं तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहे.
तसेच फोटो शेअर केल्यानंतर शाल्मली म्हणाली की, “22 नोव्हेंबर 2019 हा माझ्या आयुष्यातील सर्वात स्पेशल दिवस होता.
माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझं लग्न झालं. तसेच आमचा लग्न सोहळा आमच्या घरातील लिविंग रूममध्ये झाला.
तरी या सोहळ्याला आमचे फक्त मोजके नातेवाईक आणि घरच्या मंडळींनी हजेरी लावली होती.

 

दरम्यान, बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार लग्नबेडीत अडकत आहेत. त्यामध्ये शाल्मलीनं आपले लग्न अत्यंत साधेपणानं आणि गुपचूप उरकून घेतलं.
लग्नामध्ये दोघंही अत्यंत सुंदर दिसत होते. तर शाल्मलीचा (Shalmali Kholgade) लूक अगदी साधा होता.
शाल्मलीने नारंगी आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून, कानामध्ये झुमके आणि केसात गजरा माळला होता.
दरम्यान, हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले असून, त्या दोघांच्या गळ्यातील माळांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
त्या दोघांच्या गळ्यातील माळात कागदी फुल आणि त्या दोघांच्या फोटोपासून तयार करण्यात आल्या होत्या.

Web Title :  Shalmali Kholgade | singer shalmali kholgade teis knot with boyfriend farhan shaikh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | अजित पवारांनी केलं महिलांचं कौतुक ! महिला पायलटचा ‘तो’ किस्सा सांगितला…(व्हिडीओ)

नोकरी गेल्याने प्रभावित होऊ शकतो तुमचा Credit Score, एक्सपर्ट सांगतात या 5 गोष्टींची घ्यावी काळजी 

Maratha Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख