‘या’ ५ अभिनेत्री झाल्या लैंगिक शोषणाच्या शिकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या या ५ प्रसिद्ध अभिनेत्रीवर झाले होते लैंगिक अत्याचार याचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे. या पाच अभिनेत्री कोण आहेत ? ते आपण सविस्तर जाणून घेऊया…

राधिका आपटे
बॉलिवूडमध्ये बोल्ड सीनसाठी ओळखली जाणारी वेब सीरीजची सुपरहिट अभिनेत्री राधिका आपटे हीने लैंगिक अत्याचाराचा सामना केला. साउथ चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान एक अभिनेता वाईट भावनेने तिला स्पर्श करत होता. तो व्यक्ती तिच्या पायांना वारंवार स्पर्श करत असताना राधिकाने त्याला जोरात गालावर चापट मारली.

प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये १० व्या “वीमेन इन द वर्ल्ड समिट” च्या दरम्यान तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला. ती म्हणाली की, ‘रुममध्ये कदाचित एकदा तरी या परिस्थितीशी सामना करावा लागतो’.

https://www.instagram.com/p/ByUDeIjjNbJ/

कल्की केकलां
एका मुलाखतीत कल्कीने सांगितले की, ‘मी जेव्हा ९ वर्षाची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. मी एका व्यक्तीला शरीर संबध ठेवण्यासाठी परवानगी दिली होती मात्र, तेव्हा मला याचा अर्थ माहित नव्हता’.

सोमी अली
सोमी अलीची ओळख बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच सलमान खानची एक्स गलफ्रेंड म्हणून आहे. ती म्हणाली की, ‘मी ५ वर्षाची होते तेव्हा माझ्यासोबत लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळी मी याची शिकार झाले होते’.

कंगना रणौत
कंगना रणौतन स्वत: लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ‘मी जेव्हा १६ वर्षाची होते. तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला तेव्हा मी एफआयआर दाखल केली होती’.