Shambhuraj Desai | मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मोरणा गुरेघर प्रकल्पाचे (Morana Gureghar Project) रखडलेले काम येत्या आठ दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिल्या. मरळी येथील निवासस्थानी पाटण तालुक्यातील पाटबंधारे कामांचा आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पालकमंत्री देसाई (Shambhuraj Desai) बोलत होते.

 

यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह.तू. धुमाळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील, उप अभियंता सौरभ जोशी, सहायक अभियंता सागर खरात आदी उपस्थित होते.

 

ज्या गावांमध्ये काम करण्यास विरोध आहे. तिथे ग्रामस्थांशी चर्चा करून काम सुरू करण्याच्या सूचना करून
पालकमंत्री देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत.
उत्तर मांड प्रकल्पाबाबत पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा. त्यानुसार प्रकल्पाची मंजुरी तातडीने घेता येईल.

 

Web Title :- Shambhuraj Desai | Complete the work of Morana Gureghar Medium Project in eight days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Suburban District Level Youth Award | मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

MLA Sanjay Shirsat | सुषमा अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल, पोलीस आयुक्तांना दिले कारवाई करण्याचे निर्देश

Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून प्रतिबंधीत गुटखा जप्त, एकाला अटक