Shambhuraj Desai | ‘बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला आता त्यांच्याच मुलाला आणि नातवाला…’; शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सेनेला आता एका मांडीवर राष्ट्रवादीनं (NCP) तर दुसऱ्या मांडीवर काँग्रेसने (Congress) बसवलं आहे. ठाकरे सेनेला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय असा टोला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला. ज्या बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला त्यांच्या मुलाला आणि नातवाला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे इतरांचा आधार घ्यावा लागतो ही खरी शोकांतिका असल्याची टीका मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

 

नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, दिशा सालियान (Disha Salian) प्रकरणी सभागृहात चर्चा सरु असताना नवीन माहिती समोर आली आहे. पूर्वीच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या नव्हत्या किंवा जाणीवपूर्वक आणल्या नाहीत. त्या माहितीची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटलं. तपासून घ्यायच्या अगोदरच नाना पटोले कुठल्या आधारे माहिती खोटी असल्याचा दावा करतात. तपास यंत्रणेचा अहवाल आल्यावर यावर भाष्य करता येईल असं प्रत्युत्तर देसाई यांनी पटोले यांना दिले.

 

शंभूराज देसाई म्हणाले, दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भात आले नाहीत.
मराठवाड्याच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरु आहे मात्र विरोधक चर्चेत सहभागी होत नाहीत.
अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला. समर्पक उत्तरे सर्वांना दिली.
सभागृह सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात असतात.
आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे असून त्यांची कामे करायचे असल्याचे देसाई म्हणाले.

 

Web Title :- Shambhuraj Desai | it is a real tragedy that thackeray sena has to take support from someone in politics shambhuraj desai target uddhav thackeray and sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा