Shambhuraj Desai | गोव्यातून दारुची एक बाटली आणली तरी…, शिंदे सरकारचा आदेश, राज्यातील मद्यविक्रेत्यांना दिलासा, महसुलही वाढणार

मुंबई : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी गोव्यातून महाराष्ट्रात मद्य (Alcohol) आणणार्‍यांवर यापुढे मोक्काअंतर्गत (MCOCA Action) Mokka कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) आणि सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना (Excise Duty Officer) हे आदेश देण्यात आल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे. तस्करी करणार्‍यांविरोधात एक प्रस्ताव तयार करून अधिकार्‍यांनी तो पोलीस प्रशासनाला (Police Administration) पाठवावा जेणेकरुन पोलिसांना मकोकाअंतर्गत कारवाई करता येईल, असे देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटले आहे.

कर्नाटक (Karnataka) व गोवा (Goa) राज्यातून होणारी अवैध मद्याची (Illegal Liquor) वाहतूक रोखण्यासाठी या मार्गांवर कडक तपासणी सुरु करा. यासाठी तात्पुरते चेक नाके उभारण्यासाचे प्रस्ताव पाठवा त्यांना त्वरित मान्यता देण्यात येईल, असे मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी कोल्हापुरात अधिकार्‍यांच्या घेतलेल्या बैठकीत सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या (State Government) या आदेशामुळे राज्यातील मद्यविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे, तसेच राज्य सरकारचा महसुलही वाढणार आहे.

देसाई (Shambhuraj Desai) यांनी माहिती देताना सांगितले की, गोव्यातून महाराष्ट्रात अवैधपणे मद्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले असून वारंवार अशा तस्करांविरोधात कारवाई करत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. वाहनाचा पाठलाग करत किंवा तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणार्‍या छोट्या रस्त्यांवर सुद्धा तात्पुरत्या स्वरुपात चेकपॉइंट्स उभारा, असे शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला सांगितले आहे.
गोवा आणि सिंधुदूर्ग जिल्हा जोडलेला आहे.
असे अनेक मार्ग आहेत ज्यांचा वापर करत कोल्हापूरलाही जाता येते.
कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने या रस्त्यांवर तपासणी होत नाही.

कोल्हापूरमधील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे (Ravindra Awle) यांनी सांगितले की, तपासणी होत नाही अशा रस्त्यांच्या ठिकाणी सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जाऊ शकतात अशा केबिन तयार करणार आहोत. सध्या वारंवार गुन्हा करणार्‍यांविरोधात मकोकाच्या कलम 93 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे तस्करीचे प्रमाण कमी होईल.

अधिकार्‍याने सांगितले की, करोना काळात गोव्यातून महाराष्ट्रात मद्य तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू होती.
अजूनही तस्करी सुरू आहे.
दरातील मोठ्या फरकामुळे भारतीय बनावटीच्या परदेशी दारुची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते.
महाराष्ट्रात 900 रुपयांना मिळणारी दारूची बाटली गोव्यात अवघी 300 रुपयांत मिळते.

नफा कमावण्यासाठी गोव्यातील मद्य दुकानांचे मालक रस्तेमार्ग मद्य नेण्यासाठी अनेकदा ग्राहकांना व्हिजिटर्स परमिट देतात. पण हे परमिट काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येच वैध आहे.
मात्र, महाराष्ट्रात हे परमिट वैध नाही. कायद्यानुसार गोव्यातून महाराष्ट्रात दारुची एक बाटलीही आणता येत नाही.

Web Title :- Shambhuraj Desai | maharashtra government excise minister shamburaj desai liquor goa sindhudurg kolhapur mcoca

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Andheri East by Election | शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाची पहिली परीक्षा, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Girish Mahajan | एकनाथ खडसेंच्या BJP प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले – मी, फडणवीस, खडसे एकत्र…

CM Eknath Shinde | धक्कादायक! शिंदे गटात या…नाहीतर एन्काऊंटर!! माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी पोलिसांमार्फत दिली धमकी, कुटुंबासह आत्महत्येचा इशारा