Shambhuraj Desai On Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याबाबत कार्यवाही करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : Shambhuraj Desai On Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर २५-३० किमी अंतरावर पर्यायी रस्त्यांसाठी इंटरचेंज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुलभ होण्यासाठी शहरांना जोडणाऱ्या इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai On Samruddhi Mahamarg) यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गासंदर्भात (Mumbai–Nagpur Expressway) प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री देसाई म्हणाले की, समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District)
पळसखेड फाटा येथील इंटरचेंजमुळे पलीकडच्या गावांना २२-२४ किमी अंतर पार करून जावे लागते.
यासाठी पळसखेड ते असोला फाटा हे ९ किमी अंतर आणि जउळखेड मार्गे ते असोला फाटा हे १२ किमी अंतर
असे दोन पर्याय आहेत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येतात.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan)
यांच्याशी याबाबत चर्चा करून दोन्ही पर्यायांपैकी कुठला पर्याय वापरता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येईल.
तसेच समृद्धी महामार्गावरील स्मार्ट सिटीच्या संदर्भातील प्रस्तावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
प्रस्तावित स्मार्ट सिटींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Web Title : Shambhuraj Desai On Samruddhi Mahamarg | To avoid traffic congestion on Samriddhi Highway, action will be taken regarding alternative road at the interchange – Minister Shambhuraj Desai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalyukt Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुणे जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित