Shambhuraj Desai | मॉलमध्ये वाईनविक्री सुरु करण्याबाबत शंभूराज देसाईचे संकेत; मविआ सरकारच्या काळात विरोध करणारे फडणवीस देणार का होकार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री (Wine Sales in Supermarket) करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने (BJP) याला विरोध केला होता. राज्य पातळीवर आंदोलन करण्यात आली. मात्र आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तयारी राज्य सरकारने (State Government) केल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री (Minister of State Excise) शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठं विधान केलं आहे. सामान्य नागरिकांचा याबाबत विचार घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर अहवाल ठेवण्यात येणार आहे. यानंतर कॅबिनेटमध्ये त्या स्तरावर या निर्णयासंदर्भात अंमलबजावणी होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. परंतु त्याला भाजपचा विरोध होता. मात्र आता शिंदे सरकार (Shinde Government) वाईन विक्रीच्या निर्णयावर ठाम आहे. मॉलमध्ये वाईन विक्रीचे धोरण हे राज्याच्या हिताचे आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे, असे म्हणत शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत असल्याचे सांगितले. तसेच येत्या 15 दिवसांत यासंदर्भातील अहवाल माझ्याकडे येईल, त्यानंतर मी स्वत: अभ्यास करुन लोकांची मत काय आहेत, हे जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय घेईन असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

देसाई म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्येही मी या खात्याचा राज्यमंत्री होतो. मात्र, वाईन विक्रीच्या या निर्णयाच्या ड्राफ्टबाबत भाजपला योग्य ती माहिती मिळाली नाही, असा खुलासा त्यांनी केले. मागील सरकारच्या काळात प्राप्त झालेल्या लोकांच्या मतांची विभागणी करण्यात येत आहे. यामध्ये शहरी भागातील लोकांची मते आणि ग्रामीण भागातील लोकांची मते अशी विभागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने त्याला तीव्र विरोध केला होता.
महाराष्ट्र राज्याला ‘मद्य’राज्याच्या वाटेवर नेण्याचा या सरकारचा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली होती.
याबाबत जोरदार आंदोलन करण्यात आले होते.
यानंतर महाविकास आघाडी सरकारने मॉलमधील वाईन विक्रीचा निर्णय रद्द केला होता.
मात्र आता राज्यात पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर शंभुराज देसाई यांनी या निर्णयाबाबत पुण्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
परंतु ज्या भाजपने त्या निर्णयाला विरोध केला होता, आता तोच सत्तेत आहे.
त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Shambhuraj Desai | policy of selling wine in malls is in the beneficial of the state say shambhuraje desai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर

Building slab collapses in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा मृत्यू