Shambhuraj Desai | ‘धोतऱ्याच्या कडू बिया’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शंभूराज देसाई यांचा टोला, म्हणाले-‘102 दिवस कारागृहात असल्यामुळे त्यांना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात (Goregaon Patrachal Scam) शिवसेनचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांचा बुधवारी पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला. 102 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊत आपल्या स्टाईलमध्ये परतले अन् पहिला वार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला. एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदाचित 102 दिवस ते कारागृहात होते, त्यामुळे त्यांना बाहेर घडणाऱ्या गोष्टींची कल्पना नसेन. मात्र, आमच्या पक्षाचे नावच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb’s Shiv Sena) आहे, असे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) म्हणाले.

 

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, आमच्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’’ असे आहे. कदाचित 102 दिवस ते कारागृहात होते. त्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना नसेन. आम्ही शिवसेना सोडलेली नाही किंवा पक्षही फोडला नाही. बहुमतातली शिवसेना ही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे. त्यामुळे संजय राऊत अशी वक्तव्य करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही त्यांची नेहमीची सवय आहे, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी राऊतांना दिले.

आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच पुढे जात आहोत.
मात्र, ही वेळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेवर का आली हे तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांना समजले असेल.
केवळ संजय राऊत यांच्यामुळे 40 आमदार आणि 12 खासदारांनी अशी भूमिका घेतली.
त्यामुळे आता संजय राऊतांचे किती ऐकायचे हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवण्याची गरज आहे, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

 

Web Title :- Shambhuraj Desai | shambhuraj desai replied to sanjay raut criticism on shivsena party name

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Rate Today | तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Shivsena MP Sanjay Raut | ‘मी माझा एकांत सत्कारनी लावला’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut | संजय राऊत मातोश्रीवर नंतर जाणार सर्वप्रथम शरद पवारांच्या भेटीला