Shambhuraj Desai | ‘संजय राऊतांच्यात हिंमत असेल तर…’ शंभूराज देसाईंचं राऊतांना आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Cabinet Minister Dada Bhuse) यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला. यावर निवदेन देताना दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नावाचा उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक होत दादा भुसे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे दादा भुसे यांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळलं. दादा भुसेंनी शरद पवारांचा कोणताही अवमान करण्याचा उद्देश नसल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितलं.

काय म्हणाले दादा भुसे?

दादा भुसे यांनी सभागृहात संजय राऊतांचे ट्विट वाचून दाखवलं. त्यानंतर राऊतांवर टीका करताना म्हणाले, आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्विट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भुसे यांनी राऊतांच्या ट्विटवर दिली.

भुसेंचा राऊतांना इशारा

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. 26 मार्चपर्यंत माफी मागितली नाही. तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघेंचे (Anand Dighe) शिवसैनिक (Shiv Sainik) त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दादा भुसे यांनी दिला.

अजित पवार आक्रमक

दादा भुसेंच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला संताप व्यक्त केला. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण दादा भुसेंनी त्यांची भूमिका मांडताना आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचं काडीचंही कारण नव्हतं. दादा भुसेंनी जे सभागृहात म्हटलं, ते रेकॉर्डवरुन काढण्यात यावं, अशी मागणी अजित पवारांनी केली.

शरद पवारांचं योगदान सर्व देशानं पाहिलं – शंभूराज देसाई

राष्ट्रवादीने दादा भुसे यांना घेतल्यानंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दादा भुसेंना शरद पवारांचा कोणताही अवमान करण्याचा उद्देश नव्हता, असं सांगितलं. शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रासह देशाला आदर आहे. राज्याचं नेतृत्व शरद पवारांनी देशात केलं. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय आम्हाला माहिती आहे. साखर उद्योगाच्या संदर्भात शरद पवारांचं योगदान सर्व देशानं पाहिलं आहे. पण दादा भुसे यांनी केलेलं विधान संजय राऊत जे आमच्या मतांवर निवडून आले आणि आता आम्हाला डुक्कर, गटारातील पाणी, प्रेत असं बोलतात, त्यांच्याबद्दल आहे, असं शंभूराज देसाईंनी सांगितलं.

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…

शरद पवारांबाबत दादा भुसेंनी अनुद्गार काढले नाहीत. मात्र, आमच्या बद्दल कोणी काहीही बोललं,
तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या मतांवर निवडून आलेले जे महागद्दार आहेत,
त्यांना आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. शरद पवारांबाबत आदर असून,
कोणताही अवमान करण्याचा उद्देश नाही. संजय राऊतांच्यात हिंमत असेल, तर राजीनामा देऊन परत निवडून यावं,
असं आव्हान शंभूराज देसाई यांनी दिलं.

Web Title :-  Shambhuraj Desai | shambhuraj desai reply ncp over dada bhuse remark sharad pawar assembly sanjay raut reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Nitin Gadkari | नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन, जयेश पुजारीच्या नावाने धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, पोलिसांकडून तपास सुरु

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली