Shambhuraj Desai | ‘दोन दिवसांची मुदत, वक्तव्य मागे घ्या अन्यथा…’, शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे 22 आमदार (Shinde Group MLA) वैतागले आहेत. हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत आणि 13 पैकी 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत. कामं होत नाहीत, तुच्छतेची वागणूक मिळत आहे. अशी तक्रार आमदार, खासदारांची तक्रार असल्याचे ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी म्हटले होते. तसेच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी 15 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निरोप पाठवला होता. आमची गळचेपी होत आहे. विनायक राऊतांच्या दाव्यावर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत राऊतांना इशारा दिला आहे.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे केलेले विधान खोटे आहे. त्यामुळे राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे. तसेच सुरतला गेलो तेव्हाच मातोश्रीचे (Matoshree) दार बंद केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

ठाकरेंसोबत अर्धा सेकंदही बोललो नाही

 

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक (Legislative Council Elections) झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उद्धव ठाकरे परिवारासाठी अर्धा सेकंदही माझे बोलणे झाले नाही. तसेच कोणत्याही त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य 1001 टक्के धादांत खोटे आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत असे बोलले असावेत. मात्र, त्यांनी माझ्या बाबत केलेले विधान मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. यानंतर कायदेशीर कारवाई (Legal Action) केली जाईल, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.

अजित पवारांचे भाषण नैराश्येतून

 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाटण येथे बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले, अजित पवारांचे भाषण हे नैराश्येतून केल्याचे दिसून आले. कारण, त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यात एखादं-दुसरं बॅनर दिसलं. तर पाटणमध्ये एकच स्वागत कमान दिसून आली. सभागृहातही दोन हजारांपेक्षा अधिक माणसे ऐकण्यासाठी नव्हती. मागील सहा महिन्यात पाटणकरांचे दोन पराभव केल्याने राष्ट्रवादी आणि पाटणकर गट (Patankar Group) गलितग्रस्त झाला आहे, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

बारामतीला किती निधी दिला…

 

Advt.

अजित पवार यांनी बोलताना निधीबाबत वक्तव्य केलं. यावर देसाई म्हणाले, अडीचवर्षे ते उपमुख्यमंत्री (DyCM) आणि अर्थमंत्री (Finance Minister) होते. मी अर्थराज्यमंत्री होतो. तरीही त्यांनी बारामतीला किती निधी नेला ते पाहावं, असं आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं. तर कऱ्हाड-चिपळूण रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्यांचे भाषण हे दर्जा घसरलेले असेच होते. तरीही त्यांची आणि माझी मैत्री आहे. ते असेच बोलत राहिले तर मी यापेक्षा जास्त बोलणार नाही.

अजित पवारांना राऊतांची भुणभुण ऐकायची सवय

 

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची सकाळची भुणभुण ऐकायची सवय
अजित पवार यांना असावी असा टोला लगावताना राऊतांच्या डोक्यावर पत्रा चाळीची टांगती सुरी आहे.
ती कधी काळी येईल ते समजणार नाही. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)
यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील (CM Eknath Shinde)
टीकेच्या प्रश्नावर ते मोठे नेते असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच जमालगोटा हा ग्रामीण शब्द भागात वापरतात,
हे त्यांना माहित नसावे असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.

 

Web Title :  Shambhuraj Desai two days for vinayak raut withdraw the statement otherwise says shambhuraj desai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा