Shambhuraj Desai | राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy rain) सर्वाधिक फटका कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. कोकणातील चिपळून (Chiplun) परिसरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्रीय मंत्री नरायण राणे (Narayan Rane) यांनी पूरग्रस्त चिपळूनचा दौरा केला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने राणे यांचा पारचा चांगलाच चढला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल तावातावाने बोलले. ‘सीएम बीएम गेला उडत’ असा शब्दप्रयोग करत त्यांनी जिल्हाधिकारी यांना (Collector) फोनवर झापले. राणे यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेतून (Shivsena) प्रखर प्रतिक्रिया उमटत आहे. राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राणे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांना थेट इशारा दिला आहे.

केंद्रीय मंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते. त्यांनी पूरग्रस्त चिपळूनचा दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी किंवा अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते. त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चिपळून दौऱ्यावर होते. त्यामुळे बहुतांश अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत होते. यावरुनच राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी एका अधिकाऱ्याला समोरच झापले, तर जिल्हाधिकारी यांना फोन करुन झापले.

 

सीएम बीएम गेला उडत

यावेळी रागाच्या भरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्यांचा तोल गेला. सीएम बीएम गेला उडत. मला नावं नका सांगू कुणाची. इथं कोण अधिकारी आहे ते सांगा. इतके दिवस तुम्हाला खूप सोसल पण आता नाही, अशा शब्दात राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दम भरला होता. राणे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात (social media) व्हायरल (Video viral) झाल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. आता यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांना इशारा दिला आहे.

देसाई यांचा राणेंना इशारा
नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे.
पण पक्षाने सांगितले म्हणून आम्ही सारे शांत आहोत.
जर पक्षाकडून आदेश आला तर राणे यांना जशास तसे उत्तर देऊ.
आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री आहोत, हे लक्षात ठेवा,
असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारपूर्वक शब्द वापरावेत, असा इशारा देसाई यांनी दिला.

Web Title :- shambhuraj desai warns narayan rane for criticizing uddhav thackeray in satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes cure | डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुशखबर ! बायोकॉनच्या नव्या औषधाला मंजूरी; जाणून घ्या कसा फायदा मिळणार

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 7,431 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

IAS Transfer | राज्यातील 14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रताप जाधव यांची ‘यशदा’च्या उप महासंचालक पदी नियुक्ती