Shambhuraj Desai | महाविकास आघाडीने घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय रद्द होणार ?, शंभूराज देसाई म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय (Supermarket Wine Sell Decision) घेतला होता. वाईन विक्रीच्या या निर्णयामुळे भाजपने (BJP) जोरदार आक्षेप घेतला होता. परंतु आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने (Shinde Govt) हा निर्णय रद्द करायचा की नाही, यासंदर्भात चाचपणी सुरु केली असल्याची माहिती उत्पादन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. तसेच विदेश मद्याच्या दरात कपात केल्याने जास्त महसूल मिळाल्याची कबुली शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

 

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारने (Thackeray Govt) घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा सपाटा लावला आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Extension) झाला असून खातेवाटप नुकतेच जाहीर झाले आहे. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty) मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

 

शंभूराज देसाई म्हणाले, मागील सरकारच्या काळात विदेशी मद्यावरील कर (Foreign Liquor Tax) 50 टक्के कमी केल्याने दुप्पट कर गोळा झाला.
या निर्णयाआधी शेजारच्या राज्यांमध्ये कमी कर असल्यानं हे विदेशी मद्य तस्करी द्वारे राज्यात येत होते.
याला आता आळा बसला असून विदेशी मद्याची विक्री वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

याशिवाय सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवण्याचा निर्णय पब्लिक डोमेनमध्ये ठेवला होता. त्यासंदर्भात लोकांची मते विभागाने घेतली आहेत.
त्याच्या आढावा घेण्यास सांगितले आहे. हा निर्णय विचार करुन घेवू, असंही देसाईंनी स्पष्ट केलं.
उद्या अधिवेशन सुरु होणार असून आज विभागाचा आढावा घेतला.
राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याच्या तिजोरीत रक्कम मिळवून देणारा विभाग आहे.
सध्या सहा महीने पूर्ण झाले असून उर्वरीत महिन्यात टार्गेट पूर्ण करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.

 

Web Title : –  Shambhuraj Desai | will the decision to cancel the sale of wine in super markert information given by shambhuraj desai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा