Shambhuraje Desai | गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी घेतली पोलिसांची ‘झाडाझडती’, अधिकार्‍याचे उपटले कान (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शूंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारत सातारा शहर पोलीस ठाण्याला (Satara City Police Station) अचानक भेट दिली. शासकीय लवाजमा बाजूला ठेऊन शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) सातारा पोलीस ठाण्यात पोहचले. गृहराज्यमंत्री अचानक पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. देसाई यांनी भेटीदरम्यान त्याठिकाणी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विविध विषय, गुन्हे यांची माहिती घेत कामचुकार अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

 

 

यावेळी त्यांनी नगरसेवक बाळू खंदारे (Corporator Balu Khandare) याच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या तपासातील ढिलाईबाबत अधिकारी यांचे कान उपटले. तसेच ततडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. आज (सोमवार) दुपारी 12 सुमारास शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) हे त्यांच्या पोवईनाका येथील कोयना दौलत या निवासस्थानातून दुचाकीवरुन बाहेर पडले. दरवेळी पुढेमागे असणारा शासकीय वाहनांचा ताफा जागेवरच थांबवत ते यामाहा दुचाकी वरुन पोवई नाक्याकडे मार्गस्थ झाले.

 

 

दुचाकीवरुन थेट पोलीस ठाण्यात

तेथून ते पोलीस मुख्यालयाकडे (police headquarters) जाणाऱ्या रस्त्यावरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या विविध भागांची पाहणी केली. तसेच चौकशी करुन गुन्ह्याच्या तपासासाठी आणलेल्यांची तसेच उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची विचारपूस केली. यानंतर अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून त्यांनी मागील पंधरा दिवसांत घडलेले गुन्हे (Crime) आणि त्यातील गुन्हेगारांवर काय कारवाई केली, याबाबतचा आढावा घेतला. माहिती घेत असतानाच त्यांनी पोलीस अधीक्षक (SP), अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Addi SP), उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पोलीस ठाण्याच आलेचे मेसेज वायरलेसवरुन देण्यास सांगितले.

 

 

तपास अधिकाऱ्यांकडे चौकशी

जिल्हा बँक निवडणुकीचे (District Bank Election) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठीच्या बंदोबस्तात वरिष्ठ अधिकारी व्यस्त असल्याने त्यांनी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत फरार नगरसेवक खंदारेच्या गुन्ह्याची चौकशी केली. तो का सापडत नाही, याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी त्यांनी गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बोलावून घेत खंदारे का सापडत नाही, त्याच्या साथीदरांचा जामीन कसा झाला, यासंदर्भात प्रश्न विचारत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले.

 

पोलिसांना सज्जड दम
मागील काही दिवसांपासून शहर पोलिसांच्या कारभारावर नागरिकांमध्ये चुकीची चर्चा सुरु असल्याने मला हे करावे लागत
असल्याचे शंभूराज देसाई यांनी चुकीचे काम करणाऱ्यांवर मला खात्यांतर्गत कारवाई करावी लगेल, असा सज्जड दम दिला.
शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
खुद्द गृहराज्य मंत्र्यांनी झाडाझडती घेतल्याने पोलिसांची तपासाची गती वाढेल अशी चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

 

वर्दीवर टोपी घालायला लाज वाटते का ?
शंभूराज देसाई यांनी अचानक पोलीस ठाण्याला भेट दिली.
त्यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर शासकीय टोपी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे संतापलेल्या देसाई यांनी वर्दीवर टोपी घालत जा, लाज वाटते का, का स्वत:ला हिरो समजता,
अशा शब्दात टोपी न घातलेल्या कर्मचाऱ्यांचे कान उपटले.

 

Web Title :- Shambhuraje Desai | Minister of State for Home Affairs shambhuraje desai visit satara city police station on yamaha motorcycle and warn police officers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Officer Sameer Wankhede | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा, म्हणाले – ‘माझे वडील हिंदू, तर आई…’

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील’

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचे समीर दाऊद वानखेडेंबद्दल 2 खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘पहचान कौन’